एटापल्लीत आविसंच्या अश्विनी आईलवार विजयी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2017 00:41 IST2017-12-15T00:40:07+5:302017-12-15T00:41:44+5:30

एटापल्ली नगर पंचायतमधील वार्ड क्रमांक १० मध्ये नगरसेवक पदासाठी घेण्यात आलेल्या पोटनिवडणुकीत आदिवासी विद्यार्थी संघाच्या उमेदवार अश्विनी रमेश आईलवार या विजयी झाल्या आहेत.

Ashwini Ivillwar of Avatu won the election | एटापल्लीत आविसंच्या अश्विनी आईलवार विजयी

एटापल्लीत आविसंच्या अश्विनी आईलवार विजयी

ठळक मुद्देभाजपला झटका : न.पं.पोटनिवडणूक

लोकमत न्यूज नेटवर्क
एटापल्ली : एटापल्ली नगर पंचायतमधील वार्ड क्रमांक १० मध्ये नगरसेवक पदासाठी घेण्यात आलेल्या पोटनिवडणुकीत आदिवासी विद्यार्थी संघाच्या उमेदवार अश्विनी रमेश आईलवार या विजयी झाल्या आहेत.
पोट निवडणुकीत अश्विनी आईलवार यांना १४१ मते मिळाली. काँग्रेसच्या उषा ठाकरे यांना १२३, भाजपच्या प्रिती मोहुर्ले यांना ८७ तर शिवसेनेच्या उमेदवार सुषमा मुलकावार ३१ मते मिळाली. नोटाला चार मतदान झाले. विशेष म्हणजे, या वार्डात यापूर्वी भाजपच्या उमेदवार निर्मला कोनबत्तुलवार या निवडून आल्या होत्या. भाजपला या निवडणुकीत पराभव झाल्याने भाजपची एक जागा कमी झाली आहे. निवडणुकीनंतर एटापल्ली शहरातून विजयी रॅली काढण्यात आली. या रॅलीत विजयी उमेदवार अश्विनी आईलवार, माजी आमदार दीपक आत्राम, जिल्हा परिषद उपाध्यक्ष अजय कंकडालवार, जिल्हा परिषद सदस्य सारीका आईलवार, पंचायत समितीचे उपसभापती निलेश मट्टामी, प्रविण आईलवार, प्रज्वल नागुलवार यांच्यासह आदिवासी विद्यार्थी संघाचे कार्यकर्ते सहभागी झाले होते.

Web Title: Ashwini Ivillwar of Avatu won the election

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.