आश्रमशाळा शिक्षकांची गरंजीला भेट

By Admin | Updated: April 27, 2017 01:19 IST2017-04-27T01:19:31+5:302017-04-27T01:19:31+5:30

मुलचेरा तालुक्यातील गरंजी गावाला रेगडी येथील आश्रमशाळेच्या शिक्षक, शिक्षिकांनी बुधवारी भेट देऊन गावातील व्यसनमुक्त अभियानाची माहिती जाणून घेतली.

Ashram Shala Teacher's visit to Garangi | आश्रमशाळा शिक्षकांची गरंजीला भेट

आश्रमशाळा शिक्षकांची गरंजीला भेट

रेगडीचे शिष्टमंडळ : व्यसनमुक्तीची माहिती जाणली
घोट : मुलचेरा तालुक्यातील गरंजी गावाला रेगडी येथील आश्रमशाळेच्या शिक्षक, शिक्षिकांनी बुधवारी भेट देऊन गावातील व्यसनमुक्त अभियानाची माहिती जाणून घेतली.
गरंजी हे गाव २० आॅक्टोबर २०१५ पासून नशामुक्त झाले आहे. १०० टक्के व्यसनमुक्त होणारे विदर्भातील एकमेव गाव आहे. व्यसनमुक्त गावाची कार्यपद्धती जाणून घेण्याकरिता रेगडी आश्रमशाळेचे प्रा. कमलाकर तिडके यांच्या नेतृत्त्वात शिक्षक व शिक्षिकांनी भेट दिली. जिल्ह्यात दारूबंदी असतानाही दुर्गम भागात मोठ्या प्रमाणात दारूविक्री केली जात होती. गरंजी परिसरही याला अपवाद नव्हता. परंतु जि. प. शाळेचे मुख्याध्यापक विजय कारखेले यांच्या पुढाकाराने गावात व्यसनमुक्तीचा संकल्प करण्यात आला. त्यानंतर गाव व्यसनमुक्त झाले.
भेटीदरम्यान अश्विनी भूईमार, दिनेश केवे, राजाभाऊ गजभिये, लक्ष्मण मंडल, देवाजी कस्तुरे, जयश्री थेरे उपस्थित होत्या. मुख्याध्यापक कारखेले यांनी नशामुक्त गावाची कार्यपद्धती शिष्टमंडळाला समजावून सांगितली. (वार्ताहर)

Web Title: Ashram Shala Teacher's visit to Garangi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.