आश्रमशाळांचे क्रीडा संमेलन सुरू

By Admin | Updated: August 28, 2015 00:14 IST2015-08-28T00:14:15+5:302015-08-28T00:14:15+5:30

एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प गडचिरोली अंतर्गत कारवाफा बिटस्तरीय क्रीडा संमेलनाचे उद्घाटन शिक्षण विस्तार अधिकारी व्ही. वाय. भिवगडे यांच्या हस्ते गुरूवारी पार पडले.

Ashram Schools' Sports Meetings continue | आश्रमशाळांचे क्रीडा संमेलन सुरू

आश्रमशाळांचे क्रीडा संमेलन सुरू

गडचिरोली : एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प गडचिरोली अंतर्गत कारवाफा बिटस्तरीय क्रीडा संमेलनाचे उद्घाटन शिक्षण विस्तार अधिकारी व्ही. वाय. भिवगडे यांच्या हस्ते गुरूवारी पार पडले. सदर खेळ गडचिरोली येथील शासकीय इंग्रजी माध्यमाच्या शाळेत सुरू असून यामध्ये ५६१ खेळाडूंनी सहभाग नोंदविला आहे.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी केंद्रप्रमुख प्रभाकर कोठारे होते. प्रमुख अतिथी म्हणून मुख्याध्यापक डब्ल्यू. के. भोयर, सुधीर शेंडे, मुख्याध्यापक सुभाष लांडे, मुख्याध्यापिका यशोधरा उसेंडी, डब्ल्यू. के. मडकाम, एम. के. गेडाम, डी. डी. गलगट, संदीप दोनाडकर, व्ही. जी. चाचरकर आदी उपस्थित होते. चार दिवसीय क्रीडा संमेलनात गडचिरोली, कारवाफा, पोटेगाव, पेंढरी, गोडलवाही येथील शासकीय तर चांदाळा, गिरोला, गट्टा येथील अनुदानीत आश्रमशाळेतील ५६१ खेळाडूंनी सहभाग घेतला. संमेलनात कबड्डी, खो-खो, व्हॉलीबॉल, हॅन्डबॉल या सांघिक खेळासोबतच वैयक्तिक खेळांचे आयोजन केले आहे.
उद्घाटनप्रसंगी इंग्रजी माध्यमाच्या आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांनी गोंडी नृत्य सादर केले. उद्घाटनपर कबड्डी सामन्यात पोटेगाव आश्रमशाळेने कारवाफा आश्रमशाळेवर मात केली.
प्रास्ताविक सुभाष लांडे, संचालन प्रतीभा बनाईत, के. पी. मेश्राम तर आभार करिष्मा राखुंडे यांनी मानले. के. पी. मेश्राम यांनी खेळाडू व पंचांना शपथ दिली. यशस्वीतेसाठी संदीप राठोड, मोरेश्वर धवणे, संदीप फड, मीना श्रीरामे, बुलबुले वाळके, सतीश पवार, सुधीर झंझाळ, के. जी. गेडाम, ए. डब्ल्यू. बोरकर, वाल्मिक घोडाम, ज्ञानेश्वर बावनथडे, विनायक भेंडारकर, ए. एम. बारसागडे, जे. डी. धांडे, निर्मला हेडो, एम. पी. चंबुलवार, निर्मला हजारे, भास्कर राजगडे यांच्यासह कर्मचारी व विद्यार्थ्यांनी सहकार्य केले. (नगर प्रतिनिधी)

Web Title: Ashram Schools' Sports Meetings continue

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.