आश्रमशाळा विद्यार्थिनी दक्षिण कोरिया दौऱ्यावर

By Admin | Updated: January 10, 2016 01:41 IST2016-01-10T01:41:44+5:302016-01-10T01:41:44+5:30

शालेय जीवनातच बचतीचे महत्त्व पटवून देण्यासाठी कुरखेडा तालुक्यातील घाटी आश्रमशाळेची १० व्या वर्गात शिकणारी विद्यार्थिनी सोनी सोनवानी ही दक्षिण कोरियाला जाणार आहे.

Ashram School students visit South Korea | आश्रमशाळा विद्यार्थिनी दक्षिण कोरिया दौऱ्यावर

आश्रमशाळा विद्यार्थिनी दक्षिण कोरिया दौऱ्यावर

गडचिरोली : शालेय जीवनातच बचतीचे महत्त्व पटवून देण्यासाठी कुरखेडा तालुक्यातील घाटी आश्रमशाळेची १० व्या वर्गात शिकणारी विद्यार्थिनी सोनी सोनवानी ही दक्षिण कोरियाला जाणार आहे. ती ११ ते १५ जानेवारीदरम्यान दक्षिण कोरियाची राजधानी सेऊल येथे होणाऱ्या ‘एशियन युथ फायनान्शिअल एज्युकेशन कॅम्प’ कार्यक्रमादरम्यान ती मार्गदर्शन करणार आहे.
मेलजोल संस्था मुंबई अंतर्गत आम्ही आमच्या आरोग्यासाठी कुरखेडा या संस्थेच्या वतीने कुरखेडा, कोरची, आरमोरी व धानोरा या २४१ शाळांमध्ये विद्यार्थ्यांसाठी अफलातून बचत, शालेय परिसरात परसबाग लागवड करून फळांची बाजारात विक्री करून पैसे मिळविणे, स्वत: शाळेची बँक चालविणे आदी उपक्रम राबविले जातात. या उपक्रमांमध्ये घाटी आश्रमशाळेची सोनी सोनवानी हिने प्रत्यक्ष सहभाग घेतला आहे. या उपक्रमासाठी निवड होणारी सोनी सोनवानी ही महाराष्ट्रातील एकमेव विद्यार्थिनी आहे. (नगर प्रतिनिधी)

Web Title: Ashram School students visit South Korea

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.