शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

आश्रमशाळेतील विद्यार्थी दुपारच्या सत्रात वर्गात मारतात डुलक्या; प्रभावी अध्यापन कसे होणार?

By दिलीप दहेलकर | Updated: August 13, 2023 19:56 IST

सकाळच्या भोजनाची वेळ बदलल्यामुळे दुसऱ्या सत्रात काही विद्यार्थी वर्गात डुलक्या मारताना दिसतात तर काही विद्यार्थी सुस्तावलेले असतात. त्यामुळे प्रभावी अध्यापन कसे होणार? असा प्रश्न निर्माण हाेत आहे.

गडचिरोली : आदिवासी विकास विभागाच्या राज्यातील शासकीय व अनुदानित आश्रमशाळा शैक्षणिक सत्र २०२३-२४ पासून नव्या शालेय वेळापत्रकाप्रमाणे दोन सत्रामध्ये भरत आहेत.या वेळापत्रकाची अंमलबजावणी १० जुलै २०२३ पासून सुरू झाली असून नव्या वेळापत्रकाचे परिणाम विद्यार्थी व कर्मचाऱ्यांच्या आरोग्यावर झाल्याचे दिसून येत आहे. सकाळच्या भोजनाची वेळ बदलल्यामुळे दुसऱ्या सत्रात काही विद्यार्थी वर्गात डुलक्या मारताना दिसतात तर काही विद्यार्थी सुस्तावलेले असतात. त्यामुळे प्रभावी अध्यापन कसे होणार? असा प्रश्न निर्माण हाेत आहे.

पहिली ते बारावीपर्यंतच्या आश्रमशाळेत सुमारे दोनशे ते चारशेच्या आसपास आदिवासी विद्यार्थी शिकत असतात. आश्रमशाळेतील दुर्गम व अतिदुर्गम भागातील विद्यार्थ्यांना तसेच कर्मचाऱ्यांना अनेक गैरसोय व समस्यांना सामोरे जावे लागते. अशा परिस्थितीत तणाव निर्माण करणाऱ्या या वेळापत्रकामुळे विद्यार्थी व कर्मचारी त्रासल्याचे दिसून येते. हे वेळापत्रक अत्यंत गैरसोयीचे असून आदिवासी विद्यार्थ्यांवर अन्याय करणारे आहे. सकाळ सत्रातील पाचव्या तासिकेला विद्यार्थ्यांचे मन लागत नाही. 

इयत्ता पहिली ते सातव्या वर्गातील विद्यार्थी भुकेने व्याकुळलेले असतात. मोठे विद्यार्थी कसेबसे तग धरून राहतात पण त्यांचेही वर्गात पाहीजे तसे मन लागत नाही, ही बाब शिक्षकांच्या लक्षात आलेली आहे. जेवणानंतर लगेच सुरु होणाऱ्या दुसऱ्या सत्रात मात्र काही विद्यार्थी अक्षरशः डुलक्या मारतात तर काही विद्यार्थी सुस्तावलेल्या अवस्थेमध्ये वर्गात बसतात, ही वस्तुस्थिती आहे. नव्या वेळापत्रकाला आश्रमशाळेतील शिक्षक व कर्मचाऱ्यांनी विरोध केला असून या पाठोपाठ आता विद्यार्थी व पालकांचाही विरोध होत असल्याचे दिसत आहे.

आदिवासी विकास आश्रमशाळा शिक्षक व कर्मचारी संघटना या वेळापत्रकाला विरोध करीत आहे. सदर वेळापत्रक विद्यार्थी व कर्मचाऱ्यांवर लादल्या गेल्याची भावना आश्रमशाळेतील कर्मचारी,विद्यार्थी व पालकांमध्ये निर्माण झालेली आहे. पूर्वीचेच वेळापत्रक ठेवण्याबाबत मुख्यमंत्री ,आदिवासी विकास मंत्री यांना संघटनेने निवेदन दिलेले आहे. परंतु अजूनपर्यंत वेळापत्रक बदललेले नाही.

असे आहे आश्रमशाळेचे वेळापत्रकनव्या वेळापत्रकाप्रमाणे विद्यार्थ्यांना पहाटे ५.३० वाजता उठावे लागते तर रात्री ९.३० वाजता झोपेची वेळ असते. सोमवार ते शुक्रवारला पहिले शालेय सत्र सकाळी ८.४५ वाजता सुरू होऊन दुपारी १२.३० वाजता संपते. जेवणानंतर दुसऱ्या सत्राला दुपारी १.३० वाजता सुरुवात होते व दुपारी ४.०० वाजता तासिका संपल्यानंतरही हा सत्र सायंकाळी ६.०० वाजेपर्यंत असतो. सकाळचे जेवण दुपारी १२.३० वाजता तर रात्रीचे जेवण सायंकाळी ६.३० वाजता असते. सकाळी व सायंकाळी दोन वेळेस नाश्ता असतो. शनिवारला शालेय सत्रास सकाळी ७.४५ वाजता सुरुवात होऊन ११.५० ला सुट्टी होते. शनिवारला दुपारी ३.०० ते ४.३० पर्यंत प्रेरणादायी उद्बोधन असते.

२३ ऑगस्टला आश्रमशाळा शिक्षकांचा एल्गारया अन्यायकारक वेळापत्रकाच्या विरोधात व अन्य मागण्यांसाठी आता आदिवासी विकास आश्रमशाळा शिक्षक व कर्मचारी संघटनेचे राज्य अध्यक्ष डॉ.डी.एल. कराड, राज्य कार्याध्यक्ष एस.जे.शेवाळे, राज्य सरचिटणीस प्रा.बी.टी. भामरे,नागपूर विभागीय अध्यक्ष रामदास खवशी, ठाणे विभागीय अध्यक्ष राजेश पाटील, अमरावती विभागीय अध्यक्ष डॉ.अशोक झुंझारे, नाशिक विभागीय अध्यक्ष अमोल वाबळे यांच्या नेतृत्वात आश्रमशाळेतील शिक्षक व कर्मचाऱ्यांनी आझाद मैदान मुंबई येथे २३ ऑगस्ट रोजी धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. 

टॅग्स :Gadchiroliगडचिरोली