प्रदेश निवडणूक समितीवर अशोक नेते
By Admin | Updated: October 4, 2016 00:58 IST2016-10-04T00:58:19+5:302016-10-04T00:58:19+5:30
भारतीय जनता पार्टीच्या महाराष्ट्र प्रदेश निवडणूक समितीच्या सदस्यपदी गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्राचे खा. अशोक नेते यांची निवड करण्यात आली आहे.

प्रदेश निवडणूक समितीवर अशोक नेते
गडचिरोली : भारतीय जनता पार्टीच्या महाराष्ट्र प्रदेश निवडणूक समितीच्या सदस्यपदी गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्राचे खा. अशोक नेते यांची निवड करण्यात आली आहे. सदर निवड प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दाणवे यांनी केली आहे.
खा. अशोक नेते हे मागील २५ वर्षांपासून भाजपा पक्षात एकनिष्ठने काम करून पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी मोलाची भूमिका बजावित आहे. यापूर्वी त्यांनी आदिवासी आघाडीचे प्रदेश अध्यक्ष म्हणून काम केले असून सध्या गडचिरोलीचे भाजपाचे जिल्हाध्यक्ष म्हणूनही काम सांभाळत आहेत. त्यांच्या कार्याची दखल घेऊन प्रदेश निवडणूक समितीवर सदस्य म्हणून त्यांची निवड करण्यात आली आहे. या निवडीमुळे आपली जबाबदारी आणखी वाढली असल्याची प्रतिक्रिया खा. अशोक नेते यांनी व्यक्त केली आहे. त्यांच्या निवडीबद्दल पालकमंत्री अम्ब्रीशराव आत्राम, आ. डॉ. देवराव होळी, आ. क्रिष्णा गजबे, जि. प. सदस्य प्रशांत वाघरे, रवींद्र बावनथडे, जिल्हा उपाध्यक्ष रामेश्वर सेलुकर, अरगेला यांनी आनंद व्यक्त केला आहे.