फुटपाथ दुकान संघटनेतर्फे अशोक नेते यांचा सत्कार
By Admin | Updated: June 18, 2014 00:13 IST2014-06-18T00:13:25+5:302014-06-18T00:13:25+5:30
फुटपाथ दुकानदार संघटना कॉम्प्लेक्सतर्फे गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्राचे नवनिर्वाचित खासदार यांचा नुकताच सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी फुटपाथ दुकानदार संघटनेचे अध्यक्ष

फुटपाथ दुकान संघटनेतर्फे अशोक नेते यांचा सत्कार
गडचिरोली : फुटपाथ दुकानदार संघटना कॉम्प्लेक्सतर्फे गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्राचे नवनिर्वाचित खासदार यांचा नुकताच सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी फुटपाथ दुकानदार संघटनेचे अध्यक्ष पांडूरंग जनबंधू होते. प्रमुख अतिथी म्हणून राजू खंगार उपस्थित होते.
फुटपाथ दुकानदारांना कायमस्वरूपी व्यवसाय करण्याकरिता जागा उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न केले जातील. फुटपाथ दुकान संघटनेच्या मागण्यांसंदर्भात प्रयत्नरत राहण्याचे आश्वासन खा. अशोक नेते यांनी केले. समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न करू असे ते म्हणाले. कार्यक्रमाचे संचालन व आभार संघटनेचे सचिव टिळक कुलसंगे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संघटनेचे सहसचिव नियाझ खा पठाण, कोषाध्यक्ष मनोहर नंदेश्वर, उपाध्यक्ष रामभाऊ भगत, संगिता निंबाळकर, गीता शहा, संजीत पाल, चंद्रशेखर गेंदेवार, तुळशीराम मोरांडे, सुनिल भोयर, सुंदर शेटी, यशवंत जेटेवार, प्रिती वेलादी यांनी सहकार्य केले. (शहर प्रतिनिधी)