रवी बोमनवार यांना अटक करा

By Admin | Updated: June 9, 2014 23:36 IST2014-06-09T23:36:53+5:302014-06-09T23:36:53+5:30

चामोर्शी येथील सरपंच मालन बोदलकर व काही ग्रा.प. सदस्य तसेच कर्मचारी हे ग्रामपंचायतीच्या मालकीच्या जागेवरील अतिक्रमण थांबविण्यासाठी गेले असता, ६ जून रोजी तंटामुक्त समितीचे अध्यक्ष रवीशंकर

Arrest Ravi Bomanwar | रवी बोमनवार यांना अटक करा

रवी बोमनवार यांना अटक करा

चामोर्शीत कडकडीत बंद : महिला व नागरिक रस्त्यावर उतरले
चामोर्शी : चामोर्शी येथील सरपंच मालन बोदलकर व काही ग्रा.प. सदस्य तसेच कर्मचारी हे ग्रामपंचायतीच्या मालकीच्या जागेवरील अतिक्रमण थांबविण्यासाठी गेले असता, ६ जून रोजी तंटामुक्त समितीचे अध्यक्ष रवीशंकर बोमनवार व त्यांचे पुत्र अभिषेक बोमनवार यांनी सरपंचाना शिविगाळ करून मारहाण केली. तसेच महिला सरपंचाचा विनयभंग  केला. याप्रकरणी रवीशंकर बोमनवार व अभिषेक बोमनवार यांच्यावर तत्काळ गुन्हा दाखल करून अटक करण्यात यावी, या मागणीसाठी सोमवारी चामोर्शीत कडकडीत बंद पाळण्यात आला.
तसेच उद्या १0 जून रोजी चामोर्शी येथील महिला तहसील कार्यालयावर मोर्चा नेणार आहेत. पोलिसांनी कारवाई न केल्यास आत्मदहन करण्याचा इशारा ग्रा.पं. सदस्य राहूल नैताम, सोपान नैताम, अविनाश चौधरी यांनी दिलेला आहे. सोमवारी पाळण्यात आलेल्या बंद आंदोलनाचे नेतृत्व ग्रा.पं. सदस्य नितीन वायलालवार, पं.स. सदस्य वैभव भिवापुरे, ग्रा.पं. सदस्य सुमेध तुरे, राहूल नैताम, सोपान नैताम, विजय शातलवार, अविनाश चौधरी, नैताम, सतीश पुठ्ठावार, महेश मारकवार, चंदू खरवडे, निलेश काटकर, मानापुरे, किरण आकुलवार, स्वप्नील चिंतलवार, अमर वरगंटीवार, नितीन कोत्तावार, प्रविण चिंतलवार, प्रकाश गजपुरे, बंटी पिपरे, बालाजी गव्हारे, पिपरे, ईश्‍वर पिपरे, मयूर आनंदवार, लोकेश शात्तलवार, गजेंद्र बारसागडे, रूपेश भांडेकर, दशरथ बारसागडे, धनराज मडावी, सरपंच मालन बोदलकर, महिला आयोगाच्या तालुकाध्यक्ष मंदा तुरे, शिला सोमनकर, मधुमिता सातपुते, कमल किरंगे, आशा मुळे, शारदा भोयर, लता गव्हारे, योगीता कुनघाडकर, मंदा दुधबावरे, सरीता वैरागडे, ताराबाई पिपरे, विमल नैताम, कांता गव्हारे, अंतकला बारसागडे, कमल सोमनकर, विमल किरमे आदींनी केले.
(तालुका प्रतिनिधी)
 

Web Title: Arrest Ravi Bomanwar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.