खाते चुकांमध्ये आरमोरी आघाडीवर
By Admin | Updated: March 8, 2015 00:48 IST2015-03-08T00:48:46+5:302015-03-08T00:48:46+5:30
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या कामावरील मजुरांना बँक खात्यामार्फत मजुरी द्यावयाची आहे. गडचिरोली जिल्ह्यात आरमोरी तालुक्यात तब्बल ४०४ मजुरांचे ...

खाते चुकांमध्ये आरमोरी आघाडीवर
गडचिरोली : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या कामावरील मजुरांना बँक खात्यामार्फत मजुरी द्यावयाची आहे. गडचिरोली जिल्ह्यात आरमोरी तालुक्यात तब्बल ४०४ मजुरांचे खाते क्रमांक चुकीच्या झाल्याने जवळजवळ १ लाख ५७ हजार २५२ रूपये प्रशासनाकडे परत आले आहे.
संपूर्ण जिल्ह्यात १० तालुक्यांमध्ये ११३५ मजुरांच्या बँक खात्याचे क्रमांक चुकीच्या झाले असल्याने ५ लाख ४१ हजार २३७ रूपये प्रशासनाकडे परत आले आहे. प्रशासनाने आता संबंधित मजुरांना संपर्क साधून त्यांचे सुधारित खाते घेण्याची तयारी सुरू केली आहे. चुकीच्या खात्यामुळे गतवर्षी रोहयोवर काम करणाऱ्या मजुरांना अद्यापही मजुरी मिळालेली नाही. जिल्ह्यात चामोर्शी व देसाईगंज तालुक्यात एकाही मजुराचा खातेक्रमांक चुकलेला नाही. त्यामुळे या दोन्ही तालुक्यात मजुरांना पूर्ण रक्कमेचा वाटप झालेला आहे. आरमोरीनंतर गडचिरोली तालुक्यात १६२ तर धानोरा तालुक्यात १२९ मजुरांचे खाते क्रमांक चुकलेले आहे. त्यामुळे येथेही आता सुधारणा करून रक्कम शासनाला जमा करावी लागणार आहे. यामुळे प्रशासनाची डोकेदुखी वाढत आहे. रोजगार हमी योजनेचे काम जिल्ह्यात यंदाही मोठ्या प्रमाणावर सुरू आहे. विशेषत: सहकारी बँकेकडे दुर्गम भागात ही रक्कम जमा केली जाते.