कबड्डी स्पर्धेत अर्जुनी मोरगाव अव्वल
By Admin | Updated: December 18, 2015 02:03 IST2015-12-18T02:03:56+5:302015-12-18T02:03:56+5:30
गडचिरोली लोकसभा क्षेत्र युवक कॉंग्रेसच्या वतीने शिवाजी महाविद्यालयाच्या पटांगणावर रविवारपासून सुरु झालेल्या रात्रकालीन कबड्डी स्पर्धेचा समारोप बुधवारी झाला.

कबड्डी स्पर्धेत अर्जुनी मोरगाव अव्वल
युवक काँग्रेसतर्फे रात्रकालीन क्रीडा : कोरचीच्या दोन संघांनी पटकाविले द्वितीय व तृतीय बक्षीस
गडचिरोली : गडचिरोली लोकसभा क्षेत्र युवक कॉंग्रेसच्या वतीने शिवाजी महाविद्यालयाच्या पटांगणावर रविवारपासून सुरु झालेल्या रात्रकालीन कबड्डी स्पर्धेचा समारोप बुधवारी झाला. या स्पर्धेत अर्जुनी मोरगाव संघ विजेता ठरला असून वनश्री कोरची संघ उपविजेता तर वनश्री कोरची (अ) संघाने तृतीय क्रमांक पटकाविला. विजेत्या तिन्ही संघांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक देऊन गौरविण्यात आले.
समारोप व बक्षीस वितरण सोहळ्याचे उद्घाटन कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष माजी आ. डॉ. नामदेव उसेंडी यांच्या हस्ते झाले. यावेळी आरमोरी विधानसभा क्षेत्राचे माजी आ. आनंदराव गेडाम, जिल्हा परिषद बांधकाम सभापती अतुल गण्यारपवार, प्रदेश युवक कॉंग्रेसचे कुणाल राऊत, अजितसिंग, नगर परिषदेचे गटनेते प्रा. राजेश कात्रटवार, उपाध्यक्ष रमेश चौधरी, बांधकाम सभापती आनंद श्रृंगारपवार, नियोजन सभापती विजय गोरडवार, जि. प. सदस्य केसरी पाटील उसेंडी, पंकज गुड्डेवार, काँग्रेस तालुकाध्यक्ष शंकरराव सालोटकर, अरुण निंबाळकर, देवराव राठोड, प्रभाकर वासेकर, प्रकाश ताकसांडे, सतीश विधाते, रामकिरीत यादव, गडचिरोली लोकसभा युवक कॉंग्रेसचे अध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे, नंदू वाईलकर, मनोज पवार, प्रवीण मुक्तावरम आदी उपस्थित होते.
याप्रसंगी मार्गदर्शन करतांना माजी आ. डॉ. उसेंडी म्हणाले, कबड्डी हा खेळ आरोग्यासाठी लाभदायक असून आता हा खेळ लुप्त होत चालला आहे. जिकडेतिकडे केवळ क्रिकेट शौकिन दिसत आहेत. या खेळाला महत्त्व प्राप्त करुन देण्यासाठी गडचिरोली युवक कॉंग्रेसच्या वतीने ही स्पर्धा आयोजित करुन खेळाडूंना एक व्यासपिठ उपलब्ध करुन दिले आहे, असे प्रतिपादन केले. दरम्यान उपस्थित मान्यवरांनी यथोचित मार्गदर्शन केले.
कबड्डी स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी रजनिकांत मोटघरे, सौरभ मुनघाटे, अमोल भडांगे, नितेश राठोड, राकेश गणवीर, प्रतीक बारसिंगे, जीवन कुत्तरमारे, बाळू मडावी, राकेश रत्नावार, तौफिक शेख, अभिजीत धाईत, विवेक धोंगडे, राहूल मुनघाटे, नितेश बाळेकरमकर, गणेश कुळमेथे, तुषार कुळमेथे, वृषभ खैरे, वृषभ धुर्वे, राकेश गरपल्लीवार आदींनी सहकार्य केले. (शहर प्रतिनिधी)