जिल्ह्यात टरबूज लागवडीचे क्षेत्र वाढले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2018 23:14 IST2018-02-08T23:14:27+5:302018-02-08T23:14:38+5:30
गडचिरोली हा धान उत्पादक शेतकऱ्यांचा जिल्हा म्हणून ओळखले जात असले तरी काळाच्या ओघात जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांनी आता खरीप व रबी अशा दोनही हंगामात विविध पिकांचे उत्पादन घेण्यास सुरूवात केली आहे.

जिल्ह्यात टरबूज लागवडीचे क्षेत्र वाढले
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : गडचिरोली हा धान उत्पादक शेतकऱ्यांचा जिल्हा म्हणून ओळखले जात असले तरी काळाच्या ओघात जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांनी आता खरीप व रबी अशा दोनही हंगामात विविध पिकांचे उत्पादन घेण्यास सुरूवात केली आहे. जिल्ह्याच्या विविध भागातील शेतजमीन व हवामान अनुकूल असल्याने यंदाच्या रबी हंगामात गडचिरोली, आरमोरी, धानोरा तालुक्यासह अहेरी उपविभागाच्या काही भागातील शेतकऱ्यांनी टरबूज पिकाची लागवड केली आहे. सध्या हे पीक डौलात आले आहे.
१९८० च्या वन कायद्यामुळे जिल्ह्यातील मोठे व मध्यम सिंचन प्रकल्प रखडले आहेत. त्यामुळे येथील शेतकऱ्यांना दुष्काळाचा सामना करावा लागतो. मात्र गेल्या दोन वर्षांपासून शासनाच्या शेततळे, सिंचन विहीर व इतर योजनांमधून अनेक शेतकऱ्यांनी आपल्या शेतात सिंचनाच्या छोट्यामोठ्या सुविधा केल्या आहेत. या सिंचन सुविधांमुळे जिल्ह्यातील शेतकरी रबी हंगामात विविध प्रकारच्या भाजीपाल्याचे उत्पादन घेत असून अनेकांनी टरबुजाचीही लागवड केली आहे. नदी किनाऱ्या शेतजमिनीत ओलावा राहत असल्याने अशा जमिनीत टरबुजाची शेती फायदेशीर ठरते.