१५ क्विंटल धान खरेदीची मंजुरी द्या
By Admin | Updated: November 13, 2016 02:14 IST2016-11-13T02:14:12+5:302016-11-13T02:14:12+5:30
शासनाकडून आदिवासी विकास महामंडळांतर्गत सहकारी संस्थांच्या धान खरेदी केंद्रावर प्रती एकरी केवळ आठ

१५ क्विंटल धान खरेदीची मंजुरी द्या
आनंदराव गेडाम यांची मागणी : शेतकऱ्यांच्या जाणल्या समस्या
आरमोरी : शासनाकडून आदिवासी विकास महामंडळांतर्गत सहकारी संस्थांच्या धान खरेदी केंद्रावर प्रती एकरी केवळ आठ क्विंटल धान खरेदी करण्यास मंजुरी देण्यात आली आहे. मात्र यंदा चांगला पाऊस झाल्याने शेतकऱ्यांचे धान उत्पादन वाढले आहे. मात्र खरेदीची मान्यता कमी असल्याने शेतकऱ्यांची अडचण होणार आहे. त्यामुळे धान खरेदी केंद्रावर प्रती एकरी १५ क्विंटल धान खरेदी करण्याची मंजुरी देण्यात यावी, अशी मागणी माजी आमदार आनंदराव गेडाम यांनी महामंडळाचे गडचिरोली प्रादेशिक व्यवस्थापक विजय गांगुर्डे यांच्याकडे पत्रान्वये केली आहे.
आनंदराव गेडाम यांनी तालुक्यातील वडेगाव व देलनवाडी येथील धान खरेदी केंद्राला भेट देऊन तेथे धान विक्रीसाठी आणलेल्या शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्या. यावेळी सदर बाब त्यांच्या लक्षात आली. यावेळी त्यांनी केंद्र प्रमुख पुरूषोत्तम कडाम यांच्याकडून धान खरेदीची संपूर्ण माहिती जाणून घेतली. शेतकऱ्यांच्या सोयीसाठी प्रती एकरी १५ क्विंटल धान खरेदी करण्यास संस्थांना परवानगी द्यावी, अशी मागणी गेडाम यांनी केली आहे.