नरेगाच्या अतिरिक्त कामाच्या आराखड्यास मंजुरी
By Admin | Updated: March 6, 2015 01:26 IST2015-03-06T01:26:56+5:302015-03-06T01:26:56+5:30
जिल्हा परिषदेच्या नरेगा विभागाने रोजगार हमी योजनेच्या कामाचा सन २०१४-१५ या वर्षाचा अतिरिक्त नियोजन आराखड्याचा प्रस्ताव ...

नरेगाच्या अतिरिक्त कामाच्या आराखड्यास मंजुरी
गडचिरोली : जिल्हा परिषदेच्या नरेगा विभागाने रोजगार हमी योजनेच्या कामाचा सन २०१४-१५ या वर्षाचा अतिरिक्त नियोजन आराखड्याचा प्रस्ताव बुधवारी झालेल्या जि . प. च्या सर्वसाधारण सभेत सादर केला. सदर प्रस्तावाला एकमताने मंजुरी देण्यात आली. त्यामुळे आता या नियोजन आराखड्यातील ६३५३.१८ लाख रूपयाच्या निधीतून जिल्हाभरात एकुण १ हजार ६२८ कामे होणार आहेत.
राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या कायद्याचे कलम ४ व २८ अन्वये तयार करण्यात आलेली महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजना २ फेब्रुवारी २००६ पासून राज्यातील १२ जिल्ह्यात लागू केली. यात गडचिरोली जिल्ह्याचा समावेश करण्यात आला असून रोहयोची अंमलबजावणी सुरू झाली आहे. ग्रा.पं.स्तरावर ग्रामसभा घेऊन रोहयोच्या कामाची निवड करण्यात येते. कुटुंबाची नोंदणी व जॉबकार्ड वाटपाची कारवाई करण्यात आली आहे. मजुरांना मागणीनुसार कामे उपलब्ध करून देण्यासाठी जि. प. च्या नरेगा विभागाच्या वतीने कामाचा नियोजन आराखडा तयार केला जातो. जि.प.च्या सर्व साधारण सभेत रोहयोच्या अतिरिक्त नियोजन आराखड्यास मंजुरी मिळाल्यामुळे आता ६३५३.१८ लाख रूपयातून १ हजार ६२८ कामे होणार आहेत. या कामातून २३.८२ लाख मनुष्य दिवस रोजगार उपलब्ध होणार आहे.