सात पदव्युत्तर विभागाच्या ७७ पदांना मंजुरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2019 06:00 AM2019-09-24T06:00:00+5:302019-09-24T06:00:35+5:30

सद्य:स्थितीत विद्यापीठाच्या कॅम्पसमध्ये संगणकशास्त्र, भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, अप्लाईड अर्थशास्त्र व मॉसकम्युनिकेशन आदी पदव्युत्तर विभागाचे वर्ग सुरू आहेत. एमए मराठी, एमबीए हे अभ्यासक्रम अनुदानाअभावी सद्य:स्थितीत बंद आहेत. गोंडवाना विद्यापीठ परिसरात रोजगार निर्माण करणारे तसेच आवश्यक मूलभूत पद्व्युत्तर अभ्यासक्रम असणे ही या भागाची गरज होती.

Approval of 7 posts of seven postgraduate departments | सात पदव्युत्तर विभागाच्या ७७ पदांना मंजुरी

सात पदव्युत्तर विभागाच्या ७७ पदांना मंजुरी

Next
ठळक मुद्देगोंडवाना विद्यापीठ : ४९ प्राध्यापक व २८ शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांची होणार नियुक्ती

दिलीप दहेलकर ।
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : चंद्रपूर व गडचिरोली या दोन जिल्ह्यासाठी निर्माण झालेल्या येथील गोंडवाना विद्यापीठात गतवर्षीपासून नवीन सात पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रम सुरू करण्यात आले आहेत. या सात पद्व्युत्तर विभागासाठी प्राध्यापक व शिक्षकेत्तर कर्मचारी मिळून शासनाने एकूण ७७ पदांना मंजुरी प्रदान केली आहे.
या संदर्भात राज्याच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागाने १९ सप्टेंबर २०१९ रोजी नवा शासन निर्णय जारी केला आहे. येथील गोंडवाना विद्यापीठात जुने पाच पदव्युत्तर विभाग आहेत. गतवर्षीपासून नव्याने सात पदव्युत्तर विभाग सुरू करण्यात आले आहे. यामध्ये संगणकशास्त्र, भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, अप्लाईड अर्थशास्त्र, एमए मराठी, एमबीए, एमए मॉसकम्युकेशन आदी अभ्यासक्रमाचा समावेश आहे.
सद्य:स्थितीत विद्यापीठाच्या कॅम्पसमध्ये संगणकशास्त्र, भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, अप्लाईड अर्थशास्त्र व मॉसकम्युनिकेशन आदी पदव्युत्तर विभागाचे वर्ग सुरू आहेत. एमए मराठी, एमबीए हे अभ्यासक्रम अनुदानाअभावी सद्य:स्थितीत बंद आहेत. गोंडवाना विद्यापीठ परिसरात रोजगार निर्माण करणारे तसेच आवश्यक मूलभूत पद्व्युत्तर अभ्यासक्रम असणे ही या भागाची गरज होती. त्यामुळे गोंडवाना विद्यापीठात नवीन सात रोजगाराभिमुख शैक्षणिक अभ्यासक्रम सुरू करण्यासाठी आवश्यक असलेले शिक्षक व शिक्षकेत्तर पदे निर्मितीचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधिन होता. अखेर शासनाने सात अभ्यासक्रमासाठी एकूण ७७ पदांना मंजुरी प्रदान केली.
एमएससी संगणकशास्त्र विषयाला चार सहायक प्राध्यापक, एमएससी भौतिकशास्त्राला चार, एमएससी रसायनशास्त्राला चार, एमए अप्लाईड अर्थशास्त्राला चार, एमए मराठीला चार, एमबीएला चार व एमए मॉसकम्युनिकेशन विषयाला चार अशा एकूण २८ सहायक प्राध्यापकांच्या पदनिर्मितीला शासनाने मंजुरी प्रदान केली आहे. या शिवाय तांत्रिक अधिकारी, संगणक निरिक्षक, तांत्रिक सहायक, प्रयोगशाळा सहायक, निम्न श्रेणी लिपीक व प्रयोगशाळा परिचर आदी २८ शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांची नियुक्ती होणार आहे.

अनुदानासह मंजुरी मिळाल्याने प्रवेश वाढणार
गोंडवाना विद्यापीठाने गतवर्षीपासून सात पद्व्युत्तर अभ्यासक्रम विनाअनुदान तत्वावर सुरू केले होते. परिणामी येथे तासिका तत्वावर प्राध्यापक नियुक्त करण्यात आले. शिवाय एमबीए, मॉसकम्युनिकेशन व इतर अभ्यासक्रमाची प्रवेशशुल्क, शिक्षण व इतर शुल्क संबंधित विद्यार्थ्याला १०० टक्के भरावी लागत होती. त्यामुळे अपेक्षित प्रवेश होत नव्हते. मात्र आता प्राध्यापकांच्या वेतनासह अभ्यासक्रमांना अनुदानासह मंजुरी प्राप्त झाली आहे. त्यामुळे सर्वसामान्य विद्यार्थ्यांना आता प्रवेश घेणे शक्य होणार आहे.

Web Title: Approval of 7 posts of seven postgraduate departments

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.