एपीजे अब्दुल कलाम यांना आदरांजली

By Admin | Updated: July 29, 2015 01:52 IST2015-07-29T01:52:19+5:302015-07-29T01:52:19+5:30

धर्मनिरपेक्षतेचे मूर्तिमंत प्रतिक आणि अणुशक्ती व क्षेपणास्त्र तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात भारताच्या अग्निपंखांना स्वदेशीचे बळ देणारे अणुशास्त्रज्ञ,...

Appreciate it to APJ Abdul Kalam | एपीजे अब्दुल कलाम यांना आदरांजली

एपीजे अब्दुल कलाम यांना आदरांजली

शाळा, महाविद्यालये व शासकीय कार्यालयात कार्यक्रम : मान्यवरांनी व्यक्त केल्या शोकसंवेदना
गडचिरोली : धर्मनिरपेक्षतेचे मूर्तिमंत प्रतिक आणि अणुशक्ती व क्षेपणास्त्र तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात भारताच्या अग्निपंखांना स्वदेशीचे बळ देणारे अणुशास्त्रज्ञ, भारताचे माजी राष्ट्रपती, भारतरत्न ए. पी. जे. अब्दुल कलाम यांचे सोमवारी निधन झाले. मंगळवारी या महान नेत्याला गडचिरोली जिल्ह्यात विविध ठिकाणी भावपूर्ण आदरांजली वाहण्यात आली.
जिल्हा परिषद, गडचिरोली : जिल्हा परिषदेच्या वतीने मंगळवारी वीर बाबुराव शेडमाके सभागृहात भारताचे माजी राष्ट्रपती दिवंगत ए. पी. जे. अब्दुल कलाम यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यावेळी उपस्थित मान्यवरांनी अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून अभिवादन केले. यावेळी जि. प. अध्यक्ष प्रशांत कुत्तरमारे, उपाध्यक्ष जीवन नाट, मुख्य कार्यकारी अधिकारी संपदा मेहता, समाजकल्याण सभापती विश्वास भोवते, कृषी सभापती अजय कंकडालवार, अप्पर मुख्य कार्यकारी अधिकारी व्ही. एस. मुळीक, मुख्य लेखा व वित्त अधिकारी डी. बी. राऊत आदींसह जि. प. सदस्य उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन जि. प. रोहयोचे गटविकास अधिकारी एस. टी. पडघन यांनी केले.
युवक काँग्रेस, गडचिरोली : युवक काँग्रेस गडचिरोलीतर्फे डॉ. अब्दुल कलाम यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यावेळी गडचिरोली विधानसभा क्षेत्र अध्यक्ष अतुल मल्लेवार, लोकसभा महासचिव मनिष डोंगरे, आशिष कन्नमवार, सिद्धांत टेंभुर्णे, निहाल मल्लेलवार, मंगेश गुज्जनवार, आकाश बघेले, समर्थ आदी उपस्थित होते.
इंदिरा गांधी महाविद्यालय गडचिरोली : येथे श्रद्धांजली कार्यक्रमाला संस्थाध्यक्ष प्रकाश अर्जुनवार, मीना परिमल, प्रा. विरेंद्र गडसुलवार, प्रा. पवन माटे, भाऊराव शास्त्रकार, सुनील गोंगले, वैशाली माडेवार, सविता बोपचे, कल्पना वानखेडे, स्मिता टिंगुसले, दर्शना किन्नाके, सुषमा बुरले, वंदना भट, संगीता लाटरवार, वैजयंता भानारकर, चौधरी, प्रा. राजन बोरकर उपस्थित होते.
चाणक्य अभ्यासिका, गडचिरोली : येथे डॉ. अब्दुल कलाम यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संकल्प बहुउद्देशीय संस्थेचे संस्थापक प्रा. पंकज नरूले होते. प्रमुख अतिथी म्हणून कृष्णा रेड्डी, गीता भरडकर, अमित तलांडे उपस्थित होते. यशस्वीतेसाठी शीतल गेडाम, योगेश कुळमेथे, मनीष फुलसंगे, हनुमान गुज्जलवार, सुमित कुळमेथे, निकीता पारपेल्लीवार, प्राची तोडेवार, भाग्यश्री मडावी, हर्षद पेंदाम, भूषण पिपरे, स्वप्नील सरदारे, नागराणी टाकुर, टिना नरूले, पुरूषोत्तम चरडूके यांच्यासह इतर विद्यार्थी उपस्थित होते.
मुस्लिम हक्क संघर्ष समिती, गडचिरोली : स्थानिक इंदिरा गांधी चौकात डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यावेळी समितीचे जिल्हासचिव एजाद शेख, सहसचिव जुबेर शेख, जावेद अली, लियाकत अली, सुबहान शेख, पप्पू अली, अन्वर अली, शाबीर खान, अयजानूल शेख, राजीक शेख, अजय कोमलवार, अली आजम, जादीश शेख, फैजल शेख, अरबाज शेख आदी उपस्थित होते.
पारबताबाई विद्यालय, कोरची : येथे माजी राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे मुख्याध्यापक शालिकराम कराडे होते. प्रमुख अतिथी म्हणून एच. टी. भोवते, ए. एम. करंजेकर, एच. सी. मडावी, के. एल. खुणे, एस. डी. हेमके, गुरनुले, मडावी, चंद्रशेखर अंबादे, मुन्सीलाल अंबादे, कैलाश अंबादे, एस. आर. उंदीरवाडे, सहारे, पराग खरवडे, सुरेश जमकातन यांच्यासह शाळेतील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते. यावेळी मार्गदर्शन करताना मुख्याध्यापक कराडे म्हणाले की, डॉ. कलाम यांनी भारतासाठी देशी बनावटीची अनेक क्षेपणास्त्रे तयार केली. त्यामुळे त्यांना मिसाईल मॅन म्हणून ओळखले जात होते. मिसाईल मॅन ओळख असली तरी त्यांचे राहणीमान अत्यंत साधे होते. त्यांच्या विचारांचा विद्यार्थ्यांनी अंगीकार करावा, असे मार्गदर्शन कार्यक्रमादरम्यान केले.
युवा स्पंदन विद्यालय, कोरची : येथे डॉ. कलाम यांना विद्यार्थी, शिक्षक व कर्मचाऱ्यांनी श्रद्धांजली वाहिली.
वनश्री महाविद्यालय, कोरची : येथे डॉ. कलाम यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य, प्राध्यापक, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.
अ‍ॅड. विठ्ठलराव बनपुरकर मेमोरिअल कला व वाणिज्य महाविद्यालय मालेवाडा : अ‍ॅड. ़विठठलराव बनपूरकर मेमोरिअल कला व वाणिज्य महाविद्यालय मालेवाडा येथे माजी राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांना श्रद्धांजलीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जयदेव लांजेवार होते. प्रमुख अतिथी प्रा. ़दिलीप नंदेश्वर, प्रा. हिवराज राऊत, प्रा. चारूलता कऱ्हाडे, प्रा. खेवले, देवेंद्र सेलोकर, अविनाश जांभुळे, राहूल वालदे उपस्थित होते. यावेळी महाविद्यालयाचे प्राध्यापक व कर्मचारी व मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते़ कार्यक्रमाचे संचालन दिपक बनपुरकर व आभार प्रा. पंधरे यांनी मानले.
यशवंत कला व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय आरमोरी : येथे माजी राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी शाळेचे प्राचार्य व्ही. एम. हलमारे, प्रा. एम. आर. राऊत, पी. एस. झिमटे, एस. झरकर, सी. एस. बर्वे, आर. एन. ठवरे, ए. जे. बन्सोड, जे. डब्ल्यू. बरडे, एस. आर. कन्नाके, एस. जी.सहारे, डी. डी. पडोळे, जे. डब्ल्यू. बरडे, एस. डी. बागडे, श्रीकांत ढोरे आदी उपस्थित होते. यावेळी उपस्थित मान्यवरांनी डॉ. कलाम यांच्या जीवनावर प्रकाश टाकला. (लोकमत न्यूज नेटवर्क)

Web Title: Appreciate it to APJ Abdul Kalam

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.