रेगडीत स्थायी डाॅक्टर नियुक्त करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2021 04:30 IST2021-01-09T04:30:28+5:302021-01-09T04:30:28+5:30
गडचिराेली : चामाेर्शी तालुक्याच्या रेगडी येथील प्राथमिक आराेग्य केंद्रात स्थायी डाॅक्टरची नियुक्ती करावी, अशी मागणी नागरिकांनी जि.प.अध्यक्ष अजय कंकडालवार ...

रेगडीत स्थायी डाॅक्टर नियुक्त करा
गडचिराेली : चामाेर्शी तालुक्याच्या रेगडी येथील प्राथमिक आराेग्य केंद्रात स्थायी डाॅक्टरची नियुक्ती करावी, अशी मागणी नागरिकांनी जि.प.अध्यक्ष अजय कंकडालवार यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. रेगडी येथील प्राथमिक आराेग्य केंद्रात डाॅ.मेश्राम हे वैद्यकीय अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. दीड वर्षांपूर्वी डाॅ.कामदेव शेंडे हे रेगडी येथे कंत्राटी अधिकारी म्हणून नियुक्त झाले. परंतु प्राथमिक आराेग्य केंद्राशिवाय ते खासगी क्लिनिकमध्ये रुग्णांवर उपचार करतात. यासाठी त्यांनी रेगडी येथे क्लिनिक उघडले आहे. गावातच एक खासगी मेडिकल असून ते रुग्णांना अधिकची औषधी लिहून देत संबंधित मेडिकलमधून औषधी घेण्यास सांगतात. याशिवाय कामदेव शेंडे यांच्या वर्तणुकीबाबत अनेक महिलांचा आक्षेप आहे. आक्षेप आहे. त्यामुळे डाॅ.शेंडे यांच्यावर कारवाई करून येथे स्थायी डाॅक्टर नियुक्त करावे, अशी मागणी नागरिकांनी जि.प.अध्यक्ष अजय कंकडालवार यांच्याकडे निवेदनाद्वारे केली.