खोब्रामेंढा आश्रमशाळेवर प्रशासकाची नियुक्ती करा

By Admin | Updated: February 24, 2016 01:18 IST2016-02-24T01:18:50+5:302016-02-24T01:18:50+5:30

कुरखेडा तालुक्यातील धनंजय स्मृती अनुदानित पोस्ट बेसिक आश्रमशाळेचा अधीक्षक बी. आर. नाकतोडे यांनी १६ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ८.३० वाजता ....

Appoint the Administrator on the Khobrameda Ashramshala | खोब्रामेंढा आश्रमशाळेवर प्रशासकाची नियुक्ती करा

खोब्रामेंढा आश्रमशाळेवर प्रशासकाची नियुक्ती करा

आविसंची पत्रपरिषदेत मागणी : आंदोलन छेडण्याचा इशारा
गडचिरोली : कुरखेडा तालुक्यातील धनंजय स्मृती अनुदानित पोस्ट बेसिक आश्रमशाळेचा अधीक्षक बी. आर. नाकतोडे यांनी १६ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ८.३० वाजता वसतिगृहात राहणाऱ्या इयत्ता आठवीतील एका विद्यार्थिनीवर बलात्कार केला. सदर प्रकरण संस्था, मुख्याध्यापक व प्रकल्प कार्यालयामार्फत दाबण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप करीत खोब्रामेंढा आश्रमशाळेवर प्रशासकाची नियुक्ती करून कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी आदिवासी विद्यार्थी संघाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मंगळवारी गडचिरोली येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत केली.
या पत्रकार परिषदेला आविसंचे सल्लागार प्रा. दौलत धुर्वे, जिल्हाध्यक्ष क्रांती केरामे, राजू परसे, संजय गावडे, रविता नैताम, तुकेश नरोटे, हरीश दर्रो, विनोद हलामी आदी उपस्थित होते.
यावेळी बोलताना प्रा. दौलत धुर्वे व क्रांती केरामी म्हणाले, खोब्रामेंढा आश्रमशाळेत इयत्ता आठवीच्या विद्यार्थिनीवर एवढा मोठा प्रसंग ओढावूनही चार ते पाच दिवस आदिवासी विकास विभागाच्या प्रकल्प कार्यालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना या घटनेची माहिती नाही. यावरून प्रकल्प अधिकारी व कर्मचारी आदिवासी विद्यार्थ्यांप्रती किती संवेदनशील आहेत, असा प्रश्नही त्यांनी यावेळी उपस्थित केला.
खोब्रामेंढा आश्रमशाळा संस्थेची मान्यता काढण्यात यावी, पीडित मुलीच्या सुरक्षेसाठी १० लाख रूपये सुरक्षा ठेव म्हणून जमा करण्यात यावे, खोब्रामेंढा आश्रमशाळेचे मुख्याध्यापक लांजेवार, कर्मचारी काशिवार, मेंढे, झोडे यांना सेवेतून बडतर्फ करावे, पीडित मुलीच्या शिक्षणाची व्यवस्था इतर नामांकित शाळेत करण्यात यावी, अशी मागणी आविसंच्या पदाधिकाऱ्यांनी यावेळी केली. (स्थानिक प्रतिनिधी)

Web Title: Appoint the Administrator on the Khobrameda Ashramshala

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.