मुख्यालयातील पोलिसांना दीडपट वेतन लागू करा
By Admin | Updated: May 13, 2015 01:21 IST2015-05-13T01:21:40+5:302015-05-13T01:21:40+5:30
गडचिरोली जिल्हा मुख्यालय तसेच देसाईगंज, आरमोरी, चामोर्शी व अहेरी तालुका मुख्यालयातील पोलीस कर्मचाऱ्यांना दीडपट वेतन लागू करावे,

मुख्यालयातील पोलिसांना दीडपट वेतन लागू करा
गडचिरोली : गडचिरोली जिल्हा मुख्यालय तसेच देसाईगंज, आरमोरी, चामोर्शी व अहेरी तालुका मुख्यालयातील पोलीस कर्मचाऱ्यांना दीडपट वेतन लागू करावे, अशी मागणी मुख्यालयातील पोलिसांनी निवेदनाद्वारे राज्याचे मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. निवेदनात पोलीस जवानांनी म्हटले आहे की, गडचिरोली जिल्हा हा संपूर्ण नक्षलग्रस्त भाग आहे. यात पश्चिम महाराष्ट्रातील राज्य राखीव पोलीस दलातील जवानांना दीडपट वेतन लागू करण्यात आले आहे. मात्र मुख्यालयातील पोलिसांना दीडपट वेतनाचा लाभ मिळत नाही. जिल्हा मुख्यालयामध्ये राज्य राखीव पोलीस दलाचे जवान पहारा कर्तव्य बजावितात. त्यांना दीड पट वेतन लागू आहे. मात्र जिल्हा मुख्यालयातील पोलीस कर्मचारी अनेकदा दुर्गम भागामध्ये जाऊन कर्तव्य बजावितात. मात्र त्यांना दीडपट वेतन दिले जात नाही. जिल्हा पोलीस कर्मचारी मोर्चामध्ये कर्तव्य बजावितात. मात्र त्यांनाही दीडपट वेतन नाही.