कोविड लसीकरणासाठी गावकऱ्यांना आवाहन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2021 04:28 IST2021-07-17T04:28:09+5:302021-07-17T04:28:09+5:30
कोविड १९ या विषाणूजन्य आजारामुळे देशात अनेकांचा बळी गेला. या आजारावर प्रतिबंध घालण्यासाठी तोंडाला मास्क लावणे, हात स्वच्छ धुणे, ...

कोविड लसीकरणासाठी गावकऱ्यांना आवाहन
कोविड १९ या विषाणूजन्य आजारामुळे देशात अनेकांचा बळी गेला. या आजारावर प्रतिबंध घालण्यासाठी तोंडाला मास्क लावणे, हात स्वच्छ धुणे, सॅनिटायझर व लस घेणे यासह अन्य उपाययोजना शासनाने बंधनकारक केले आहे. त्यानुसार देसाईगंज येथील अनिकेत समाजकार्य महाविद्यालयांतर्गत क्षेत्रकार्य अभ्यासानुसार विद्यार्थ्यांनी तालुक्यातील गट ग्रामपंचायत डोंगरगाव (हलबी) येथे कोविड १९ लसीकरणाविषयी आवश्यक माहिती दिली. आदिवासी समुदायांतर्गत गावातील आदिवासींच्या समस्या जाणून घेतल्या.
यावेळी गावकऱ्यांना नियमित मास्क लावण्यास व लस घेण्यासाठी आवाहन करण्यात आले. यावेळी ग्रामपंचायतचे सरपंच धानगुने, उपसरपंच वनमाला पुस्तोडे, सचिव जोंजारकर, एमएसडब्ल्यू भाग २ सत्र ४ चे विद्यार्थी संकेत ढोंगे, पूनम नंदेश्वर, विशाखा नंदेश्वर, पल्लवी शेंडे, रूपेश साखरे, भारती फुलबांधे उपस्थित होते.