चामोर्शीत समस्यांची नोंद आता अॅपने
By Admin | Updated: July 8, 2017 01:14 IST2017-07-08T01:14:10+5:302017-07-08T01:14:10+5:30
चामोर्शी नगर पंचायत अंतर्गत नागरिकांच्या तक्रारींचे जलद निवारण व्हावे, या हेतूने नगर पंचायतीने

चामोर्शीत समस्यांची नोंद आता अॅपने
नगर पंचायतीचा पुढाकार : स्वच्छ महाराष्ट्र अभियान संचालकांच्या हस्ते उद्घाटन
लोकमत न्यूज नेटवर्क
चामोर्शी : चामोर्शी नगर पंचायत अंतर्गत नागरिकांच्या तक्रारींचे जलद निवारण व्हावे, या हेतूने नगर पंचायतीने नागरिकांसाठी तक्रार अॅप सुरू केले आहे. या अॅपचे उद्घाटन स्वच्छ महाराष्ट्र अभियानाचे संचालक डॉ. उदय टेकाडे यांच्या हस्ते शुक्रवारी करण्यात आले.
याप्रसंगी जिल्हा प्रशासन अधिकारी गजानन भोयर, गडचिरोलीचे मुख्याधिकारी कृष्णा निपाने, चामोर्शी न. पं. च्या मुख्याधिकारी आर्शिया जुही, नगराध्यक्ष जयश्री वायलालवार, उपाध्यक्ष राहुल नैताम, न. पं. सभापती विजय शातलवार, नगरसेवक प्रशांत येगलोपवार, रामेश्वर सेलुकर, वैभव भिवापुरे, रोशनी वरघंटे, मीनल पालारपवार, कविता किरमे, विजय गेडाम उपस्थित होते. तक्रार अॅप सुरू करणारी चामोर्शी नगर पंचायत जिल्ह्यातील पहिली नगर पंचायत आहे, असे प्रतिपादन करीत पुढील ४०-५० वर्षांचा विचार करून येथे कचरा डेपोेसाठी जागा सूचवून प्रस्ताव तयार करावे, असे निर्देश स्वच्छ महाराष्ट्र अभियानाचे संचालक डॉ. उदय टेकाडे यांनी दिले. अॅपमुळे समस्या सोडविण्यास मदत होणार आहे.
चामोर्शीतील स्वच्छता अभियानाची पाहणी
स्वच्छ महाराष्ट्र कार्यक्रमाअंतर्गत जे उपक्रम राज्यात राबविले जात आहेत, यापैकी कोणते उपक्रम चामोर्शी नगर पंचायतीने राबविले, याची स्वच्छ महाराष्ट्र अभियान मुंबईचे संचालक डॉ. उदय टेकाडे यांनी शुक्रवारी भेट देऊन पाहणी केली. चामोर्शी शहरातील सार्वजनिक शौचालय, स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत बांधले जात असलेले खासगी १ हजार ७०० शौचालय आदींची पाहणी डॉ. उदय टेकाडे यांनी केली व शौचालय बांधकामाबाबत समाधान व्यक्त केले. चमूमध्ये गडचिरोलीचे जिल्हा प्रशासन अधिकारी गजानन भोयर, गडचिरोली नगर परिषदेचे मुख्याधिकारी कृष्णा निपाने यांचा समावेश होता. स्वच्छता अभियानाच्या पाहणीप्रसंगी नगराध्यक्ष जयश्री वायलालवार, उपाध्यक्ष राहुल नैताम, मुख्याधिकारी आर्शिया जुही, न. पं. सभापती विजय शातलवार, नगरसेवक रामेश्वर सेलुकर, वैभव भिवापुरे, प्रशांत येगलोपवार, रोशनी वरघंटे, मीनल पालारपवार, कविता किरमे, विजय गेडाम व नगर पंचायतीचे कर्मचारी उपस्थित होते.