सीआरपीएफचे आणखी १५ जवान पॉझिटीव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2020 05:00 AM2020-07-16T05:00:00+5:302020-07-16T05:00:49+5:30

कोरोनाबाधित रुग्णांमध्ये धानोरास्थित सीआरपीएफ बटालियनमधील १५ जवानांचा समावेश आहे. सिरोंचा येथील एका तीन वर्षीय बालकाचाही कोरोना अहवाल पॉझिटीव्ह आला आहे. हे कुटुंब कर्नाटक येथून गडचिरोली जिल्ह्यात आले आहेत. मात्र या मुलाचे आईवडील निगेटीव्ह असून त्यांना निरीक्षणाखाली ठेवण्यात आले आहे. भामरागड येथील एक १९ वर्षीय युवक तेलंगणा राज्यातून परतला होता. त्याचा अहवाल पॉझिटीव्ह आला.

Another 15 CRPF personnel tested positive | सीआरपीएफचे आणखी १५ जवान पॉझिटीव्ह

सीआरपीएफचे आणखी १५ जवान पॉझिटीव्ह

Next
ठळक मुद्देसक्रीय रुग्णसंख्या ११३ वर : सिरोंचातील बालकालाही लागण

लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यात कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत असून रुग्णसंख्याही फुगत आहे. बुधवारी (दि.१५) पुन्हा जिल्ह्यात सीआरपीएफच्या १५ जवानांसह दोन नागरिक असे एकूण १७ कोरोनाबाधित आढळून आले. त्यामुळे जिल्ह्यात नोंद असलेल्या एकूण बाधितांची संख्या २०४ झाली आहे.
कोरोनाबाधित रुग्णांमध्ये धानोरास्थित सीआरपीएफ बटालियनमधील १५ जवानांचा समावेश आहे. सिरोंचा येथील एका तीन वर्षीय बालकाचाही कोरोना अहवाल पॉझिटीव्ह आला आहे. हे कुटुंब कर्नाटक येथून गडचिरोली जिल्ह्यात आले आहेत. मात्र या मुलाचे आईवडील निगेटीव्ह असून त्यांना निरीक्षणाखाली ठेवण्यात आले आहे. भामरागड येथील एक १९ वर्षीय युवक तेलंगणा राज्यातून परतला होता. त्याचा अहवाल पॉझिटीव्ह आला. गडचिरोली येथील सीआरपीएफचे १५ जवान, सिरोंचा येथील एक लहान मुलगा व भामरागड येथील एक नागरिक अशा एकूण १७ नवीन बाधितांची नोंद बुधवारी जिल्ह्यात झाली आहे. सध्या अ‍ॅक्टिव्ह रुग्णांची संख्या ११३ असून ९० जण आतापर्यंत बरे झाले आहेत.

आलंगा येथे १६ जण क्वॉरंटाईन
एटापल्ली : तालुका मुख्यालयापासून १२ अंतरावरील कसनसूर मार्गावर असलेल्या आलंगा टोला येथील दोन मुली मुंबईवरून गावात परत आल्या. क्वॉरंटाईन न राहता त्यांनी गावात प्रवेश केला. यापैकी एका मुलीचा अहवाल कोरोना पॉझिटीव्ह प्राप्त झाला आहे. नायब तहसीलदार चंद्रकांत तेलंग, तालुका आरोग्य अधिकारी राजेश वहाने, तोडसा प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी राकेश नागोसे यांनी आलंगा टोला गावात जाऊन १६ जणांना क्वॉरंटाईन केले. गावात एका इसमाचा मृत्यू झाला. त्याच्या अंत्यविधीसाठी मृतक इसमाची मुलगी व तिची मैत्रीण अशा दोघी मुंबईवरून मिळेल त्या वाहनाने आलंगाटोला येथे २१ जून रोजी पोहोचल्या. ही माहिती प्रशासनाला मिळताच त्यांनी या दोघींना एटापल्ली येथे क्वॉरंटाईन केले. यापैकी एका मुलीचा अहवाल १२ जुलै रोजी पॉझिटीव्ह आला. सदर मुलगी पाच दिवस गावात राहल्याने मंगळवारी व बुधवारला कर्मचाऱ्यांनी गावात जाऊन १६ जणांना क्वॉरंटाईन केले.

Web Title: Another 15 CRPF personnel tested positive

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.