तालुका क्रीडा चाचणीचा कार्यक्रम जाहीर
By Admin | Updated: July 2, 2014 23:19 IST2014-07-02T23:19:23+5:302014-07-02T23:19:23+5:30
शिव छत्रपती क्रीडापीठ पुणे यांच्या सूचनेनुसार ८ ते १४ वर्षे वयोगटातील मुला-मुलींची जिल्ह्यातील प्रत्येक शाळेत ७ जुलैपर्यंत क्रीडा नैपुण्य चाचणी घ्यावयाची आहे. यामध्ये ज्या मुला-मुलींना १७ गुण

तालुका क्रीडा चाचणीचा कार्यक्रम जाहीर
गडचिरोली : शिव छत्रपती क्रीडापीठ पुणे यांच्या सूचनेनुसार ८ ते १४ वर्षे वयोगटातील मुला-मुलींची जिल्ह्यातील प्रत्येक शाळेत ७ जुलैपर्यंत क्रीडा नैपुण्य चाचणी घ्यावयाची आहे. यामध्ये ज्या मुला-मुलींना १७ गुण मिळतील अशा मुला-मुलींना तालुकास्तरावरील क्रीडा नैपुण्य चाचणीसाठी उपस्थित राहयचे आहे. तालुकास्तरावर जे मुले-मुली १७ गुण मिळवतील त्यांची २५ व २६ जुलैला जिल्हा क्रीडा संकुल गडचिरोली येथे जिल्हास्तरीय क्रीडा नैपुण्य चाचणी घेण्यात येईल, अशी माहिती जिल्हा क्रीडा अधिकारी गडचिरोली यांनी दिली आहे.
गडचिरोली तालुक्याची क्रीडा नैपुण्य चाचणी १५ जुलै रोजी जिल्हा स्टेडीयम गडचिरोली येथे होणार आहे. वडसा, आरमोरी, कुरखेडा या तीन तालुक्याच्या क्रीडा नैपुण्य चाचण्या १६ जुलैला आदर्श इंग्लिश हायस्कूल वडसा, तालुका क्रीडा संकुल आरमोरी, श्रीराम विद्यालय कुरखेडा येथे घेण्यात येणार आहे. कोरची, धानोरा तालुक्याची चाचणी १७ जुलै रोजी श्रीराम विद्यालय कोरची व कै. महेश सावकार पोरेड्डीवार हायस्कूल चातगाव येथे घेण्यात येणार आहे. मुलचेरा, चामोर्शी या दोन तालुक्यांच्या क्रीडा नैपुण्य चाचण्या १८ जुलै रोजी राजे धर्मराव हायस्कूल मुलचेरा, शिवाजी हायस्कूल चामोर्शी येथे पार पडणार आहे.
अहेरी तालुक्याची क्रीडा नैपुण्य चाचणी १९ जुलैला भगवंतराव हायस्कूल अहेरी, भामरागड तालुक्यांची क्रीडा चाचणी २१ जुलैला, भगवंतराव आश्रमशाळा भामरागड, सिरोंचा, एटापल्ली तालुक्यांची क्रीडा नैपुण्य चाचणी २२ जुलै रोजी तालुका क्रीडा संकुल सिरोंचा व भगवंतराव माध्यमिक आश्रमशाळा एटापल्ली येथे आयोजित करण्यात आली आहे. या चाचण्यांमध्ये प्राथमिक, माध्यमिक, आश्रमशाळा व खासगी शाळांचे विद्यार्थी सहभागी होतील.