अंकिसाचा आठवडी बाजार भरला तुरळक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2020 05:00 IST2020-03-25T05:00:00+5:302020-03-25T05:00:48+5:30

अंकिसा येथील व परिसरातील गावांमधील दुकाने बंद आहेत. मात्र भाजीपाला हे जीवनावश्यक वस्तू असल्याने या ठिकाणी आठवडी बाजार भरण्यासाठी सवलत देण्यात आली. भाजीपाला खरेदी-विक्रीची दुसरी कोणतीही व्यवस्था या भागात नाही. अंकिसा परिसरातील नागरिक मंगळवारी भरणाऱ्या आठवडी बाजारावरच निर्भर असतात. त्यामुळे मंगळवारी येथे बाजार भरला. मात्र येथे विक्रेते व ग्राहकांची संख्या कमी होती.

Ankisa Weekly The market is full | अंकिसाचा आठवडी बाजार भरला तुरळक

अंकिसाचा आठवडी बाजार भरला तुरळक

ठळक मुद्देकोरोना संसर्गाचा प्रभाव : पोलीस बंदोबस्तात चालला भाजीपाला खरेदी-विक्रीचा व्यवहार

लोकमत न्यूज नेटवर्क
अंकिसा : सिरोंचा तालुक्याच्या अंकिसा येथे दर मंगळवारी आठवडी बाजार भरतो. परिसरातील २५ ते ३० गावातील लोक भाजीपाला खरेदी-विक्रीसाठी या बाजारात येतात. सध्या या भागात कोरोना विषाणूच्या संसर्गाची भीती निर्माण झाली असून प्रशासनाच्या वतीने उपाययोजना सुरू आहेत. २४ मार्च रोजी मंगळवारी येथे चोख पोलीस बंदोबस्त आठवडी बाजार तुरळक भरला.
अंकिसा येथील व परिसरातील गावांमधील दुकाने बंद आहेत. मात्र भाजीपाला हे जीवनावश्यक वस्तू असल्याने या ठिकाणी आठवडी बाजार भरण्यासाठी सवलत देण्यात आली. भाजीपाला खरेदी-विक्रीची दुसरी कोणतीही व्यवस्था या भागात नाही. अंकिसा परिसरातील नागरिक मंगळवारी भरणाऱ्या आठवडी बाजारावरच निर्भर असतात. त्यामुळे मंगळवारी येथे बाजार भरला. मात्र येथे विक्रेते व ग्राहकांची संख्या कमी होती. सदर बाजारपेठेत गर्दी होऊ नये, यासाठी पोलीस व महसूल प्रशासनाने खबरदारी घेतली. एकाच ठिकाणी गर्दी होऊ देण्यात आली नाही. नागरिकांनीही सुरक्षित अंतर ठेवून भाजीपाल्याची खरेदी केली. कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे अंकिसा परिसरातील भाजीपाला विक्रीचा व्यवसाय करणाऱ्यांचा धंदा कमी झाला आहे. नागरिकांनीही आपले विविध दैनंदिन कामे थांबविली आहेत. कोरोनाच्या भीतीने बाहेर कुठेही न जाता घरी राहणे पसंत करीत आहेत.

विवाह मुहूर्त थांबले
मार्च ते मे या तीन महिन्यात ग्रामीण भागात विवाह सोहळे मोठ्या प्रमाणात आयोजित केले जातात. अंकिसा परिसरातही काही कुटुंबातील मुला-मुलींचा विवाह जुळला आहे. मात्र कोरानाच्या पार्श्वभूमीवर मुहूर्त व लग्नाच्या तारखा निश्चित करण्यात आल्या नाही. उपवधू-वर पाहण्याचा कार्यक्रमही आता लांबणीवर पडला आहे.

Web Title: Ankisa Weekly The market is full

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.