संतप्त शेतकऱ्यांची इटियाडोह कार्यालयावर धडक
By Admin | Updated: October 4, 2015 02:11 IST2015-10-04T02:11:14+5:302015-10-04T02:11:14+5:30
इटियाडोह प्रकल्पाचे पाणी आरमोरी व परिसरातील शेतीला मिळत नसल्यामुळे संतप्त झालेल्या शेकडो शेतकऱ्यांनी शिवसेनेचे माजी जिल्हा प्रमुख हरिष मने ...

संतप्त शेतकऱ्यांची इटियाडोह कार्यालयावर धडक
शेतजमिनीच्या पाण्यासाठी अधिकाऱ्यांना घेराव : पाणी वाटप संस्था पदाधिकाऱ्यांच्या राजीनाम्याचा निर्णय
आरमोरी : इटियाडोह प्रकल्पाचे पाणी आरमोरी व परिसरातील शेतीला मिळत नसल्यामुळे संतप्त झालेल्या शेकडो शेतकऱ्यांनी शिवसेनेचे माजी जिल्हा प्रमुख हरिष मने यांच्या नेतृत्वात आरमोरी येथील इटियाडोह प्रकल्पाच्या कार्यालयावर शनिवारी धडक दिली. तसेच उपविभागीय अभियंता व शाखा अभियंत्यांना घेराव घातला.
पाणी वाटप संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी सामुहिक राजीनामा द्यावा, असा निर्णय घेण्यात आला. शेवटी अधीक्षक अभियंता नागपूर यांनी पाण्याची पातळी वाढवून पाण्याची समस्या निकाली काढण्याचे आश्वासन फोनवरून दिल्याने आंदोलन मागे घेण्यात आले. गोंदिया जिल्ह्यातील इटियाडोह प्रकल्पाचे पाणी आरमोरी परिसरातील शेतजमिनीला मिळत नसल्याने धान पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असून पीक करपण्याच्या मार्गावर आहेत. वारंवार पाणी पुरवठ्याची मागणी करूनही इटियाडोह प्रकल्पाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याची दखल घेतली नाही. त्यामुळे संतप्त झालेल्या शेकडो शेतकऱ्यांनी इटियाडोह प्रकल्प कार्यालयावर धडक दिली. यावेळी राजू अंबानी, नामदेव सोरते, अमर खरवडे, शरद भोयर, विनोद निकुरे, पाणी वाटप संस्थेचे अध्यक्ष हरी चहांदे, अशोक मारबते, शंकर घाटुरकर, श्रीकृष्ण मोंगरकर, गोपीचंद मने, शामराव हारगुळे, अभिमन्यु धोटे, तातोबा भोयर, मनोहर गोनाडे, डोकरे, गिरीधर दामले, मनोज सपाटे, गणेश तिजारे, पंकज आखाडे, शालिक कत्रे, विलास हारगुळे, गजानन सपाटे, बाळा बोरकर, प्रधान गुरूजी, मिलिंद खोब्रागडे, गजानन गुरूनुले व उपविभागीय अभियंता गोगटे, शाखा अभियंता मेंढे व शेतकरी उपस्थित होते. (वार्ताहर)