शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानवर हसावं की रडावं.... आता म्हणे मोहसीन नक्वीला गोल्ड मेडल देणार, सन्मान करणार !
2
लाखोंच्या गर्दीत हरवलेला 'मुन्ना' काही मिनिटांत 'अण्णा'च्या गळ्यात; बापलेकांची भावनिक भेट
3
सानिया मिर्झाशी घटस्फोट, आता शोएब मलिकचे सना जावेदशीही लग्न तुटणार? VIDEO मुळे उडाली खळबळ
4
नवी मुंबई विमानतळाला दि.बा.पाटील यांचेच नाव लागणार; CM फडणवीसांचे कृती समितीला आश्वासन
5
ट्रॅक्टरमध्ये बसून थेट बांधावर... सोलापूरच्या अधिकाऱ्यांची तत्परता, शेतकऱ्यांना दिला धीर
6
'फिट' है तो 'हिट' है... बॉलिवूड अभिनेत्रीचा कमालीचा फिटनेस, या वयातही चाहत्यांना करते घायाळ
7
२ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना कफ सिरप देऊ नका, केंद्राचा सल्ला; राजस्थान, मध्य प्रदेशात ११ बालकांचा मृत्यू
8
वेळागर समुद्रात आठजण बुडाले; तिघांचे मृतदेह हाती, एकीचा जीव वाचला, किनाऱ्यावर आक्रोश
9
राज्यात अतिवृष्टी, पूरस्थिती; अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेची ४-६ ऑक्टोबरला अंतिम विशेष फेरी
10
शेतकऱ्यांसाठी काँग्रेस रस्त्यावर; नुकसानग्रस्तांना तत्काळ मदत मिळण्यासाठी राज्यभर आंदोलन
11
“बावळट-मूर्ख, मनोज जरांगेंसारखा नेता मिळणे मराठ्यांचे दुर्दैव”; लक्ष्मण हाकेंचा हल्लाबोल
12
"तुम्ही आम्हाला शिकवू नका..."; भारताने पाकिस्तानला चांगलंच सुनावलं, UN मध्ये काय घडलं?
13
आशाबाई, अंबिका अन् सुनीता... सोलापुरात दोन दिवसांत तीन महिलांची हत्या, कारण एकच
14
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि.बा. पाटलांचे नाव; PM मोदींची राज्य सरकारच्या निर्णयाला मंजुरी
15
IND vs AUS : तिलक वर्माचं शतक थोडक्यात हुकलं; ऑस्ट्रेलियाविरुद्ध अभिषेकवर 'गोल्डन डक'ची नामुष्की
16
RSS च्या पथसंचलनात ढोल वाजवणाऱ्या स्वयंसेवकाचा हृदयविकाराने मृत्यू; व्हिडिओ व्हायरल
17
वैभव खेडेकरांचा तीनदा भाजपा प्रवेश रखडला, आता शिवसेनेत जाणार? शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
18
काँग्रेसनेही निवडणुकांसाठी कंबर कसली! नागपुरात ४, ५ ऑक्टोबरला विचारमंथन कार्यशाळा
19
IND vs WI: ‘ध्रुव तारा’ चमकला! पहिल्या सेंच्युरीनंतर बॅटची बंदूक करून 'बाप-माणसाला' सेल्युट! (VIDEO)
20
Business: २ मित्रांनी सोडली कॉर्पोरेट नोकरी, दूध विकून झाले कोट्यधीश, तयार केला मोठा ब्रँड!

संतप्त कर्मचाऱ्यांची जिल्हा कचेरीसमोर निदर्शने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 5, 2020 05:00 IST

अखिल भारतीय राज्य सरकारी कर्मचारी महासंघ, महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद कर्मचारी महासंघ आणि राज्य सरकारी कर्मचारी संघटनेच्या संयुक्त विद्यमाने ३ जुलै रोजी शुक्रवारला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सरकारच्या धोरणाविरोधात निदर्शने करण्यात आली.

ठळक मुद्देजिल्हाधिकाऱ्यांमार्फत शासनाला निवेदन । राज्य सरकारी, जिल्हा परिषद, ग्रामसेवक व इतर कर्मचारी सहभागी

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : अखिल भारतीय राज्य सरकारी कर्मचारी महासंघ, महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद कर्मचारी महासंघ आणि राज्य सरकारी कर्मचारी संघटनेच्या संयुक्त विद्यमाने ३ जुलै रोजी शुक्रवारला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सरकारच्या धोरणाविरोधात निदर्शने करण्यात आली.या आंदोलनाचे नेतृत्व जि.प.कर्मचारी महासंघाचे राज्याध्यक्ष उमेशचंद्र चिलबुले, राज्य सरकारी कर्मचारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष सुनील चटगुलवार, सचिव भास्कर मेश्राम, जि.प.कर्मचारी महासंघाचे जिल्हाध्यक्ष रतन शेंडे, ग्रामसेवक युनियनचे जिल्हाध्यक्ष कविश्वर बनपूरकर आदींनी केले.सदर आंदोलनात राज्य सरकारी, जिल्हा परिषद, ग्रामसेवक, नर्सेस, चतुर्थ श्रेणी कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारासमोर शासनाच्या कर्मचारीविरोधी धोरणाचा निषेध करण्यात आला. शासनाच्या धोरणाविरोधात नारेबाजी करून कर्मचाऱ्यांनी आपला रोष व्यक्त केला.या आंदोलनात जि.प.कर्मचारी महासंघाचे सरचिटणीस दुधराम रोहणकर, राज्य सरकारी चतुर्थ कर्मचारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष लतीफ पठाण, चतुर्थ श्रेणी कर्मचारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष राजू रेचनकार, महसूल कर्मचारी संघटनेचे चंदू प्रधान, किशोर सोनटक्के, संजय खोकले, बावणे, नर्सेस संघटनेच्या जिल्हाध्यक्ष विणू वानखेडे, सचिव छाया मानकर, ग्रामसेवक सहकारी पतसंस्थेचे सचिव पांडुरंग पेशने, मधुकर कुकडे, श्रीकृष्ण मंगर, खुशाल नेवारे, जीवनदास आकरे, हेमंत गेडाम, विनोद आखाडे आदीसह ग्रामसेवक व विविध विभागाचे कर्मचारी उपस्थित होते.जिल्हाधिकाऱ्यांमार्फत शासनाला कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांचे निवेदन पाठविण्यात आले. दरम्यान कर्मचाऱ्यांच्या शिष्टमंडळाने अधिकाऱ्यांशी चर्चा केली.निवेदनातील मागण्याअंशदायी पेन्शन योजना रद्द करून जुनी पेन्शन योजना लागू करावी. कंत्राट व मानधनावरील कर्मचाºयांना सेवेत नियमित करावे. महामंडळे, नगर पालिका, महानगर पालिका, शैक्षणिक संस्था, विविध प्रकल्पांमधील रिक्त पदे तत्काळ भरावी, कोविड योध्द्यांच्या सुरक्षिततेसाठी पुरेसे सुरक्षा उपकरणे उपलब्ध करून द्यावी. रबरी हातमोजे, मास्क, तोंडाला प्लास्टिक कवर, रबराचे बुट, चष्मा, फेस शिल्ड आदींचा पुरवठा कर्मचाऱ्यांसाठी करण्यात यावा. कोरोनाच्या कालावधीत लढणाऱ्या कर्मचाऱ्यांचे मार्च २०२० चे कपात केलेले २५ टक्के वेतन देण्याचे आदेश काढावे. मार्च महिन्याचे कपात केलेले वेतन त्वरीत द्यावे. महागाई भत्ता गोठवू नये. सातव्या वेतन आयोगाचा दुसरा टप्पा एक वर्षासाठी पुढे ढकलण्याचा निर्णय त्वरीत रद्द करावा. मृत कर्मचाऱ्यांच्या वारसांना १० लाख रुपये सानुग्रह अनुदान द्यावे आदी मागण्यांचा निवेदनात समावेश आहे.

टॅग्स :zpजिल्हा परिषदGovernment Employees Strikeसरकारी कर्मचाऱ्यांचा संप