अंगणवाडी महिलांचे जि. प. समोर धरणे आंदोलन

By Admin | Updated: November 4, 2015 01:41 IST2015-11-04T01:41:22+5:302015-11-04T01:41:22+5:30

आपल्या विविध प्रलंबित मागण्यांकडे शासन व प्रशासनाचे लक्ष वेधून घेण्यासाठी आयटकच्या नेतृत्वात मंगळवारी

Anganwadi women's district Par. Frontal movement | अंगणवाडी महिलांचे जि. प. समोर धरणे आंदोलन

अंगणवाडी महिलांचे जि. प. समोर धरणे आंदोलन

गडचिरोली : आपल्या विविध प्रलंबित मागण्यांकडे शासन व प्रशासनाचे लक्ष वेधून घेण्यासाठी आयटकच्या नेतृत्वात मंगळवारी शेकडो अंगणवाडी महिला कर्मचाऱ्यांनी जिल्हा परिषदेसमोर धरणे आंदोलन केले.
या आंदोलनाचे नेतृत्व आयटकप्रणीत अंगणवाडी, बालवाडी कर्मचारी युनियनचे जिल्हा संघटक देवराव चवळे, माजी जि. प. सदस्य अमोल मारकवार, जगदीश मेश्राम, विनोद झोडगे यांनी केले. वारंवार निवेदने देऊनही तसेच चर्चा करूनही गडचिरोली जिल्ह्यातील अंगणवाडी महिला कर्मचाऱ्यांच्या समस्या कायम आहेत. या संदर्भात संघटनेच्या वतीने जिल्हा परिषदेसमोर धरणे आंदोलन करण्यात आले. दरम्यान संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हा परिषद प्रशासन व राज्य शासनाच्या धोरणावर तीव्र शब्दात ताशेरे ओढले. संतप्त महिला कर्मचाऱ्यांनी प्रशासन व शासनाच्या विरोधात नारेबाजी केली. त्यानंतर संघटनेच्या शिष्टमंडळाने जिल्हा परिषदेचे महिला व बाल कल्याण अधिकारी तथा उपमुख्य कार्यकारी अधिकारी जाधव यांना प्रलंबित मागण्यांचे निवेदन सादर केले. दरम्यान यावेळी प्रलंबित मागण्यांवर अर्धातास चर्चा चालली. जिल्ह्यातील अंगणवाडी महिला कर्मचाऱ्यांचे केंद्र शासनाकडून प्राप्त झालेले आॅक्टोबर महिन्यापर्यंतच्या मानधनाची रक्कम बँकेत वर्ग करण्यात आली आहे. राज्य सरकारकडून प्राप्त झालेली सप्टेंबर महिन्यापर्यंतची मानधनाची रक्कम देण्यात आली आहे. दिवाळी बोनसही देण्यात आले आहे. अंगणवाडी महिला कर्मचाऱ्यांना ९ ते १६ नोव्हेंबरदरम्यान दिवाळी सणाच्या सुट्या दिल्या जाणार आहेत, अशी माहिती महिला व बाल कल्याण अधिकारी जाधव यांनी शिष्टमंडळातील संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना यावेळी दिली. या चर्चेदरम्यान बाराही तालुकास्तरावरील बाल विकास प्रकल्प अधिकारी उपस्थित होते.
धरणे आंदोलनाला संघटनेच्या पदाधिकारी अनिता जी. अधिकारी, शशिकला धात्रक, राधा ठाकरे, शिवलता बावनथडे, मिनती रॉय, कौशल्या गोंधळे, मीनाक्षी झोडे, गजुला उसेंडी, बसंती अंबादे, के. एम. बंडावार, शेख, जे. व्ही. कोमलवार यांच्यासह बाराही तालुक्यातील शेकडो अंगणवाडी महिला कर्मचारी उपस्थित होत्या. (स्थानिक प्रतिनिधी)

या आहेत प्रलंबित मागण्या
४दिवाळीपूर्वी दिवाळी बोनसची रक्कम अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात यावी ४दिवाळीपूर्वी आॅक्टोबर महिन्यापर्यंत थकीत मानधन, इंधन बिल, प्रवास भत्ता देण्यात यावा ४शासन निर्णयानुसार दिवाळी सणानिमित्त अंगणवाडी कर्मचाऱ्यांना आठ दिवसांच्या सुट्या देण्यात याव्या. ४अंगणवाडीतील विद्युत बिल भरण्याची कायमस्वरूपी व्यवस्था करावी. ४अंगणवाडी कर्मचाऱ्यांना शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे पूर्ववत नक्षलग्रस्त भत्ता लागू करावा. ४अंगणवाडी केंद्रात नियमित आहार पुरवठा करण्यात यावा.

Web Title: Anganwadi women's district Par. Frontal movement

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.