अंगणवाड्या विजेविनाच सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 08:51 IST2021-02-05T08:51:54+5:302021-02-05T08:51:54+5:30
कुरखेडा : प्रत्येक गावात अंगणवाड्या निर्माण करण्यात आल्या आहेत. एवढेच नाही तर शहरातील प्रत्येक वॉर्डात दोन ते तीन अंगणवाड्या ...

अंगणवाड्या विजेविनाच सुरू
कुरखेडा : प्रत्येक गावात अंगणवाड्या निर्माण करण्यात आल्या आहेत. एवढेच नाही तर शहरातील प्रत्येक वॉर्डात दोन ते तीन अंगणवाड्या आहेत. मात्र, काही अंगणवाड्यांना स्वत:च्या इमारतीच नाही. जिल्हा परिषदेने अंगणवाड्यांना वीज पुरवठा करून दिला. मात्र, वीज बिल भरणार कोण? हे निश्चित झाले नाही. ग्रामपंचायतीनेही हात वर केले. त्यामुळे अंगणवाडीचे वीज बिल भरले नाही. परिणामी अनेक ठिकाणच्या अंगणवाड्यांचा वीज पुरवठा अल्प कालावधीतच कपात करण्यात आला. काही अंगणवाड्यांनी वीज असल्याने विजेवरची साहित्य खरेदी केली. मात्र, हे साहित्य आता धूळ खात पडली असल्याचे दिसत आहे. एकीकडे अंगणवाड्या हायटेक करण्याचे निर्देश शासनाने दिले आहेत, तर दुसरीकडे वीज पुरवठा उपलब्ध नसल्याने अंगणवाड्यांमधील साहित्य निरुपयाेगी ठरत आहेत.