शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईकर म्हणून आज मला लाज वाटतेय... आणखी विकास नको; महेश मांजरेकांचा उद्विग्न सवाल, खंतही व्यक्त...
2
नव्या, मोठ्या इमारतींना २४ तास पाणी, मध्यमवर्गाला तीन तास...; मांजरेकरांनी मांडला भेदभावाचा प्रश्न
3
फडणवीस हे बसविलेले माणूस, पन्नास खोके हा गंमतीचा विषय नाही; राज ठाकरेंनी दिली ससाण्याची उपमा
4
कलयुगी लेक! प्रियकरासाठी बापाचाच काटा काढला; आईनेही दिली साथ, 'त्या' हत्येचं असं उलगडलं रहस्य
5
बनावट FASTag Annual Pass द्वारे नवीन फ्रॉड, NHAI ने दिला इशारा; कसं वाचाल, जाणून घ्या
6
"मुंबईत जन्माला आल्याशिवाय इथं काय हवं हे कळणार नाही"; राज ठाकरेंचा मुख्यमंत्री फडणवीसांवर निशाणा
7
प्रेम, धोका अन् मर्डर! रेल्वे ट्रॅक शेजारी सापडलेल्या त्या मृतदेहाचा सस्पेन्स ११ महिन्यांनी संपला, सत्य ऐकून... 
8
अमेरिकेची सर्वात मोठी EXIT! ६५ हून अधिक आंतरराष्ट्रीय संघटनांमधून बाहेर पडली, संयुक्त राष्ट्रांसह भारतालाही धक्का...
9
सचिन तेंडुलकरची होणारी सून सानिया चांडोक आहे 'या' व्यवसायिकाची नात; कोणता आहे त्यांचा बिझनेस? जाणून घ्या
10
ज्येष्ठ पर्यावरण तज्ज्ञ माधव गाडगीळ यांचे निधन, वयाच्या ८३ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
11
"तर मी स्वतःहून बाजूला होईल"; संतोष धुरींच्या भाजप प्रवेशानंतर देशपांडे म्हणाले, "मला अधिकार नाही"
12
रविवारी की सोमवारी, केव्हा सादर होणार देशाचा अर्थसंकल्प; तारखेवर शिक्कामोर्तब, जाणून घ्या
13
भारताच्या 'ऑपरेशन सिंदूर'ने पाकिस्तानची झोप उडाली; युद्ध रोखण्यासाठी अमेरिकेत ओतले कोट्यवधी रुपये!
14
"बापाच्या खांद्यावर मुलाची अंत्ययात्रा..."; वेदांताचे मालक ७५ टक्के संपत्ती समाजकार्यासाठी खर्च करणार
15
एकनाथ शिंदेंना दुखवायचे नसल्याने त्यांच्याशी युती केली; CM फडणवीसांनी सांगितली Inside Story
16
आजचे राशीभविष्य : गुरुवार ८ जानेवारी २०२६; या तीन राशींच्या लोकांसाठी आजचा दिवस शुभ फलदायी, मान व प्रतिष्ठा वाढेल
17
भाजप-काँग्रेस नगरसेवकांचा घरोबा; आधी अभद्र युती, नंतर डॅमेज कंट्रोल, अखेर कारवाई
18
“काँग्रेसचे खासदार बिनविरोध आले तेव्हा लोकशाही धोक्यात आली नाही का?”: CM देवेंद्र फडणवीस
19
अजित पवार ताणताहेत, भाजप सहन करतंय; पण का?; काका-पुतण्याच्या जोडीला मूकसंमती? 
20
देवेंद्र फडणवीस, राज ठाकरेंच्या सभांना उमेदवारांची सर्वाधिक मागणी; सभा, रोड शोंचा कल्ला सुरू
Daily Top 2Weekly Top 5

अन् मुलीची भेट होण्याआधीच पित्याचे प्राणपाखरू उडाले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2018 01:05 IST

मुलगी कितीही मोठी झाली तरी पित्याबद्दलची तिची आस्था आणि प्रेम तसुभरही कमी होत नाही. एवढेच नाही तर पित्यालाही तिच्याबद्दलचा जिव्हाळा तेवढाच कायम असतो. अशाच जिव्हाळ्यातून तब्बल ११०० किलोमीटरचा प्रवास करत एक पिता मुलीच्या घरी तिला भेटण्यासाठी निघाला.

ठळक मुद्देनियतीचा असाही खेळ : ११०० किलोमीटरच्या प्रवासानंतर कायमची ताटातूट

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : मुलगी कितीही मोठी झाली तरी पित्याबद्दलची तिची आस्था आणि प्रेम तसुभरही कमी होत नाही. एवढेच नाही तर पित्यालाही तिच्याबद्दलचा जिव्हाळा तेवढाच कायम असतो. अशाच जिव्हाळ्यातून तब्बल ११०० किलोमीटरचा प्रवास करत एक पिता मुलीच्या घरी तिला भेटण्यासाठी निघाला. आता काही तासातच मुलीची, नातवांची भेट होणार अशी आस त्या पित्याला लागली होती. पण नियतीने ही भेट होण्याआधीच कारमध्ये बसलेल्या त्या पित्याचे प्राण हिरावले.नियतीच्या या खेळात बळी पडलेल्या त्या दुर्दैवी पित्याचे नाव आहे बच्चूभाई पटेल (७०). गुजरातच्या आनंद जिल्ह्यातील चिकोदरा या गावचे रहिवासी असलेले बच्चूभाई आपले जावई गडचिरोलीतील पटेल सायकल स्टोअरचे संचालक कमलेश पटेल यांच्याकडे येण्यासाठी निघाले होते. अनेक महिन्यांनी वडिल येत आहे म्हणून त्यांची मुलगी एकता यांनी त्यांच्या आवडीचे पदार्थ करून ठेवले होते. नातवंडही त्यांच्या स्वागतासाठी उत्सुक होते. सोमवारी सायंकाळी गडचिरोलीत पोहोचण्यापूर्वी थकव्यामुळे बच्चूभाईंनी दुपारी नागपूरमध्ये थोडी विश्रांती करून त्यांची कार गडचिरोलीच्या दिशेने रवाना झाली.४.३० वाजताच्या सुमारास कार नागभीडजवळ पोहोचल्यानंतर चालकाने इंधन टाकण्यासाठी कार पेट्रोल पंपावर नेली. कारमध्ये इंधनही टाकले, पण पैसे मागण्यासाठी मागील सीटवर बसलेल्या बच्चूभाईंना आवाज दिला असता त्यांचा काहीही प्रतिसाद आला नाही. जवळ जाऊन पाहतो तर काय, बच्चूभाईंचा श्वास थांबला होता. सोबतच्या सहकाऱ्याने आणि कारचालकाने तिथेच एका रुग्णालयात नेऊन पाहिले. पण त्यांचा श्वास आता कधीही सुरू होणार नव्हता.अचानक हे कसे झाले म्हणून कारचालकही हबकून गेला. त्याने नातेवाईकांकडे संपर्क केला. पण जिच्याघरी जाण्यासाठी निघालो त्या मुलीला ही बातमी कशी द्यायची या विवंचनेतच कार गडचिरोलीत दाखल झाली. वडील आले म्हणून मुलीसह नातवंडांनी कारकडे धाव घेतली. पण कारमध्ये बच्चूभाईं चिरनिद्रेत असल्याचे पाहून सर्वांनी एकच हंबरडा फोडला. मुलीच्या भेटीसाठी तब्बल ११०० किलोमीटरचा कार प्रवास करून गुजरातवरून आलेल्या पित्याचा असा दुर्दैवी मृत्यू होण्याच्या घटनेने अनेक जण हळहळले.

टॅग्स :Deathमृत्यू