काेराेनावर ‘प्राणायाम’ची मात्रा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2021 04:38 IST2021-05-09T04:38:17+5:302021-05-09T04:38:17+5:30
प्राणायामाचे महत्त्व प्राचीन भारतीय ग्रंथांमध्ये सांगण्यात आले आहे. काही नागरिक नियमित प्राणायाम करीत असले तरी बहुतांश नागरिक मात्र याकडे ...

काेराेनावर ‘प्राणायाम’ची मात्रा
प्राणायामाचे महत्त्व प्राचीन भारतीय ग्रंथांमध्ये सांगण्यात आले आहे. काही नागरिक नियमित प्राणायाम करीत असले तरी बहुतांश नागरिक मात्र याकडे दुर्लक्ष करीत हाेते. प्राणायाम हा श्वसन यंत्रणेशी संबंधित व्यायाम आहे. प्राणायामामुळे श्वसन यंत्रणा सशक्त हाेऊन श्वसनाशी संबंधित आजार दूर हाेण्यास मदत हाेते. नाडी शोधन, शीतली, उज्जायी, कपालभाती, डीग्र, भस्त्रिका, बाह्य प्राणायाम, भ्रामरी प्राणायाम हे आठ प्रकारचे प्राणायाम आहेत. प्रत्येक प्राणायाम करण्याच्या पद्धती वेगवेगळ्या आहेत. तसेच प्रत्येकाचे परिणामही वेगवेगळे आहेत. काेराेना हा श्वसन यंत्रणेवर परिणाम करणारा राेग आहे. श्वसन यंत्रणा मजबूत करून काेराेनाला हरविणे शक्य असल्याचे तज्ज्ञ व्यक्तींकडून सांगितले जात असल्याने याेगा करणाऱ्यांचे प्रमाण वाढले आहे.
बाॅक्स
नियमित प्राणायाम केल्याचे फायदे
१) प्राणायामामुळे श्वसन यंत्रणा मजबूत हाेण्यास मदत हाेते.
२) श्वसनाशी संबंधित राेगप्रतिकारक क्षमता वाढण्यास मदत हाेते.
३) भ्रामरी या प्राणायामामुळे मस्तिष्क शांत ठेवण्यास मदत हाेते.
४) प्राणायामामुळे शरीरात निर्माण झालेली ऊर्जा दिवसभर मन प्रसन्न ठेवण्यास मदत हाेते.
५) शरीरात ऑक्सिजनचे प्रमाण वाढण्यास मदत हाेते.
बाॅक्स
अभ्यासक काय म्हणतात
पहाटेला उठून नियमित प्राणायाम केल्यास त्याचे अनेक फायदे आहेत. काेराेनाच्या या संकटात प्रत्येक व्यक्तीने वेळात वेळ काढून प्राणायाम व याेगा करावा. पहाटेच्या सुमारास प्राणायाम केल्यास त्याचे सर्वांत चांगले परिणाम दिसून येतात. याेगामुळे शारीरिक, मानसिक, वैचारिक, आध्यात्मिक विकास हाेण्यास मदत हाेते.
-सत्यनारायण अनमदवार, याेगा अभ्यासक.
प्राणायामामुळे राेगप्रतिकारक क्षमता वाढण्यास मदत हाेते. प्राणायामाचा फुफ्फुसांना फायदा हाेते. श्वसनाशी संबंधित आजार कमी झाल्याचा अनेकांचा अनुभव आहे. याेगा किंवा प्राणायाम नियमित करण्याची गरज आहे.
किरण पवार, याेगा अभ्यासक.
बाॅक्स
नियमित याेगा करणारे म्हणतात
मागील तीन वर्षांपासून मी नियमित याेगा करीत आहे. मला श्वसनाचा त्रास हाेता. हा त्रास आता दूर झाला आहे. बीपी व शुगरच्याही गाेळ्या घेत नाही. नागरिकांनी नियमित याेगा व प्राणायाम करावा.
- गीता चिपीये
याेगा व प्राणायामामुळे मन प्रसन्न राहते. पहाटेला शांत व प्रसन्न वातावरणात याेगा व प्राणायाम केल्यास शरीरात ऊर्जेचा संचार हाेतो व ही ऊर्जा दिवसभर कायम राहते.
सुनीता दिहारे.