अमित बंदेला ३० पर्यंत पोलीस कोठडी
By Admin | Updated: March 25, 2015 01:41 IST2015-03-25T01:40:10+5:302015-03-25T01:41:38+5:30
गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी व समाज कल्याण विभागात उघडकीस आलेल्या शिष्यवृत्ती घोटाळ्यातील आरोपी संकल्प सिध्दी ...

अमित बंदेला ३० पर्यंत पोलीस कोठडी
गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी व समाज कल्याण विभागात उघडकीस आलेल्या शिष्यवृत्ती घोटाळ्यातील आरोपी संकल्प सिध्दी बहुउद्देशिय विकास संस्थेचा अध्यक्ष अमित बंदे याला सोमवारी गडचिरोली पोलिसांनी अटक केली आहे. त्याला मंगळवारी न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्याला ३० मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
संकल्प- सिद्धी बहुउद्देशीय विकास संस्थेचे सावित्रीबाई फुले कॉलेज आॅफ टेक्नॉलॉजी अॅन्ड मॅनेजमेंटची प्रवेश क्षमता ५१० आहे. मात्र संस्थाचालकांनी २०१३-१४ मध्ये क्षमतेपेक्षा २५७ अतिरिक्त विद्यार्थी दाखवून ६९ लाख रूपयाच्या शिष्यवृत्तीची अफरातफर केल्याचे चौकशीत निष्पन्न झाले. त्यानंतर तत्कालीन सहायक प्रकल्प अधिकारी दशरथ कुळमेथे यांनी गडचिरोली पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली होती. त्याआधारे पोलिसांनी अमित बंदे याच्या विरूध्द ४२०, ४०९ अन्वये १ जानेवारी २०१५ रोजी गुन्हा दाखल केला होता. तेव्हापासून अमित बंदे फरार होता. गडचिरोली जिल्हा सत्र न्यायालयाने अमित बंदे याचा अटकपूर्व जामिन अर्ज नाकारल्याने सोमवारी त्याला गडचिरोली पोलिसांनी अटक केली. (प्रतिनिधी)