मोहफूल दारूअड्डा केला उद्ध्वस्त

By Admin | Updated: October 13, 2016 02:55 IST2016-10-13T02:55:19+5:302016-10-13T02:55:19+5:30

मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे आष्टी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दामदेव मंडलवार यांच्या मार्गदर्शनात सहायक पोलीस उपनिरीक्षक शरद पोटवार यांनी

The amazement of the ammunition was destroyed | मोहफूल दारूअड्डा केला उद्ध्वस्त

मोहफूल दारूअड्डा केला उद्ध्वस्त

४६ हजारांचा मुद्देमाल नष्ट : रामपूर जंगलात पोलिसांची धाड
आष्टी : मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे आष्टी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दामदेव मंडलवार यांच्या मार्गदर्शनात सहायक पोलीस उपनिरीक्षक शरद पोटवार यांनी आपल्या सहकारी कर्मचाऱ्यांसह सोमवारी राममोहनपूर जंगल परिसरात धाड टाकून येथील मोहफूल दारू अड्डा उद्ध्वस्त केला.
दरम्यान दारू गाळत असलेला आरोपी सचिन सुखदेव रॉय रा. राममोहनपूर हा फरार झाला. पोलसांनी घटनास्थळावरून मोहफूल सडव्याने भरलेले २०० लिटर क्षमतेचे १२ प्लास्टिक ड्रम, २ लोखंडी ड्रम, २ जर्मनी घमेले, २ ड्रम मोहफुलाची दारू असा एकूण ४६ हजार ३६० रूपयांचा मुद्देमाल जागेवरच नष्ट केला. सदर कारवाई पोलीस उपनिरीक्षक शरद पोटवार, पोलीस हवालदार रत्नाकर गोवर्धन, नाईक पोलीस शिपाई किरंगे, पिंकू झाडे, मनोज गौरकार यांनी केली. (प्रतिनिधी)

Web Title: The amazement of the ammunition was destroyed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.