अन्यायाविरोधात नेहमी जागृत राहा!
By Admin | Updated: January 25, 2017 02:06 IST2017-01-25T02:06:12+5:302017-01-25T02:06:12+5:30
अन्याय अत्याचाराविरोधात विद्यार्थ्यांनी नेहमी जागृत राहावे, कायदेविषयक ज्ञान ठेवून पीडितांना

अन्यायाविरोधात नेहमी जागृत राहा!
विजय पुराणिक : कायदेविषयक मार्गदर्शन
गडचिरोली : अन्याय अत्याचाराविरोधात विद्यार्थ्यांनी नेहमी जागृत राहावे, कायदेविषयक ज्ञान ठेवून पीडितांना न्याय मिळवून देण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन गडचिरोलीचे पोलीस निरीक्षक विजय पुराणिक यांनी केले.
जागृती महिला मंडळ गडचिरोलीद्वारा संचालित महिला व मुलांकरिता सहाय्य कक्ष पोलीस स्टेशन गडचिरोली व नागपूर सोशिओ टेक्नीकल सर्व्हिसेस आणि वाहतूक शाखा गडचिरोलीच्या संयुक्त विद्यमाने स्थानिक राणी दुर्गावती कन्या विद्यालयात आयोजित कायदेविषयक मार्गदर्शन कार्यक्रमात उद्घाटक म्हणून ते बोलत होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाच्या प्राचार्य एस. डी. चहांदे होत्या. प्रमुख अतिथी म्हणून अॅड. रत्नघोष ठाकरे, पोलीस उपनिरीक्षक अमृता राजपुत, मंडळाच्या सचिव विजया गद्देवार, समुपदेशक वैशाली बांबोळे, प्रा. प्रकाश सोनवाने, प्रा. देवानंद कामडी, प्रा. दुपारे, अमोल किरमिजवार आदी मान्यवर उपस्थित होते. अमृता राजपुत यांनी वाहतूक नियमांबाबत तर बांबोळे यांनी महिला व बालकांच्या अत्याचाबाबत मार्गदर्शन केले. संचालन प्रा. संध्या येलेकर यांनी केले. आभार गद्देकार यांनी मानले. (स्थानिक प्रतिनिधी)