धोडराजमध्ये जनजागरण मेळाव्यातून वस्तूंचे वाटप

By Admin | Updated: February 26, 2016 01:52 IST2016-02-26T01:52:43+5:302016-02-26T01:52:43+5:30

धोडराज पोलीस मदत केंद्रांतर्गत धोडराज गावात मंगळवारी जनजागरण मेळावा आयोजित करण्यात आला होता.

Allotment of goods through Dhajraj rally | धोडराजमध्ये जनजागरण मेळाव्यातून वस्तूंचे वाटप

धोडराजमध्ये जनजागरण मेळाव्यातून वस्तूंचे वाटप

२५ गावचे नागरिक उपस्थित : संदीप गावीत यांनी केले मार्गदर्शन
भामरागड : धोडराज पोलीस मदत केंद्रांतर्गत धोडराज गावात मंगळवारी जनजागरण मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यातून नागरिकांना जीवनोपयोगी वस्तूंचे व युवकांना खेळाच्या साहित्याचे वाटप करण्यात आले.
या कार्यक्रमाला २५ गावातील नागरिक उपस्थित होते. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावीत, धोडराजचे सरपंच रमेश पुंगाटी, उपसरपंच तुलसी रमेश कन्नाके, मलमपोडुरचे सरपंच गोई कोडापे, सामाजिक कार्यकर्ते अ‍ॅड. लालसू नरोटे आदी उपस्थित होते. या कार्यक्रमाच्या आयोजनासाठी धोडराज पोलीस मदत केंद्राचे पोलीस निरीक्षक भगवान पालवे यांनी सहकार्य केले. यावेळी एकात्मिक आदिवासी विकास विभागाचे प्रतिनिधी मेथे यांनी नागरिकांना त्यांच्या विभागाकडून राबविण्यात येत असलेल्या योजनांची माहिती दिली. तसेच वन विभागाच्या प्रतिनिधीनेही आपल्या विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या योजनांची माहिती दिली. यावेळी संदीप गावीत यांच्या हस्ते जीवनोपयोगी वस्तूंचे वाटप नागरिकांना तर युवकांना क्रीडा साहित्याचे वाटप करण्यात आले.
अ‍ॅड. लालसू नरोटे यांनी पेसा कायदा, वनाधिकार कायदा, जैव विविधता कायदा व भारत सरकारच्या योजनांची माहिती उपस्थितांना दिली.

Web Title: Allotment of goods through Dhajraj rally

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.