येणाऱ्या सर्व निवडणुका ‘भाऊं’च्या नेतृत्वात लढणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2021 04:40 IST2021-09-22T04:40:53+5:302021-09-22T04:40:53+5:30
येणाऱ्या नगर परिषद, नगरपंचायत, जिल्हा परिषद, पंचायत समिती आदी निवडणुकांसाठी संपूर्ण ताकतीने कामाला लागण्याच्या सूचना करत जिल्ह्यात काँग्रेस पक्षाच्या ...

येणाऱ्या सर्व निवडणुका ‘भाऊं’च्या नेतृत्वात लढणार
येणाऱ्या नगर परिषद, नगरपंचायत, जिल्हा परिषद, पंचायत समिती आदी निवडणुकांसाठी संपूर्ण ताकतीने कामाला लागण्याच्या सूचना करत जिल्ह्यात काँग्रेस पक्षाच्या वाढीसाठी वडेट्टीवार यांनी यावेळी मार्गदर्शन केले. यावेळी एकमेकांबद्दल मनात कटुता असलेल्यांचे वडेट्टीवार यांनी मनोमिलन घडवून आणत यापुढे एकदिलाने पक्षासाठी काम करू, असे वचन त्यांच्याकडून घेतले.
या बैठकीला जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष माजी आमदार डॉ. नामदेव उसेंडी, जिल्हा परिषद अध्यक्ष अजय कंकडालवार, जिल्हा परिषद उपाध्यक्ष मनोहर पोरेटी, प्रदेश काँग्रेसचे सचिव पंकज गुड्डेवार, जिल्हा समन्वयक हसनअली गिलानी, युवक काँग्रेसचे अध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे, शहर काँग्रेसचे अध्यक्ष सतीश विधाते, युवक काँग्रेसचे प्रदेश सचिव अतुल मल्लेलवार, सोशल मीडियाचे प्रदेश महासचिव नंदू वाईलकर, सोशल मीडिया काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष कुणाल पेंदोरकर, अनुसूचित जाती सेलचे अध्यक्ष रजनीकांत मोटघरे, जिल्हा काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष शंकरराव सालोटकर आदी प्रामुख्याने उपस्थित होते.