पावसामुळे सारेचजण सुखावले
By Admin | Updated: October 7, 2014 23:33 IST2014-10-07T23:33:39+5:302014-10-07T23:33:39+5:30
यंदाच्या खरीप हंगामात सप्टेंबर महिन्याच्या ११ तारखेपासून जिल्ह्यात पावसाने कायमची दांडी मारली होती. पावसाअभावी जिल्ह्यातील हलक्याप्रतीचे शेवटच्या घटका मोजत होते.

पावसामुळे सारेचजण सुखावले
गडचिरोली : यंदाच्या खरीप हंगामात सप्टेंबर महिन्याच्या ११ तारखेपासून जिल्ह्यात पावसाने कायमची दांडी मारली होती. पावसाअभावी जिल्ह्यातील हलक्याप्रतीचे शेवटच्या घटका मोजत होते. जड धानपीकाची शेती कडक आली होती. त्यामुळे धानपीकाला वाचविण्यासाठी शेतकऱ्यांची सर्वत्र धडपड सुरू झाली होती. मात्र आज ७ आॅक्टोबर रोजी बऱ्यापैकी पाऊस आल्याने धानपीकाला पाणी पुरवठा झाला आहे. आजच्या पावसामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांसह सारेचजण सुखावले आहे.
गेल्या महिनाभरापासून जिल्ह्यात पावसाने हजेरी लावली नाही. या कालावधीत सुर्यही कोपत होता. यामुळे धानपीकाला फटका बसत होता. प्रचंड तापमानामुळे नागरिकही हैराण झाले होते. यामुळे अनेक नागरिकांनी आपल्या घरातील कुलर सुरू केले होते. मात्र महिनाभराच्या कालावधीनंतर पाऊस झाल्याने वातावरणात गारवा निर्माण झाला आहे. आरमोरी तालुक्यातील कासवी व वैरागड परिसरातील शेतकऱ्यांची पाऊस होत नसल्यामुळे सिंचाई विभागाच्या विरोधात ओरड होत होती. घोट परिसरातील रेगडी येथील कन्नमवार जलाशयाचे पाणी १४ गावापर्यंतच्या शेतींना पोहोचत नसल्याने या गावातील नागरिकांनी प्रशासनाला धारेवर धरले होते. पाऊस झाल्यामुळे घोट परिसरातील १४ गावातील शेतकऱ्यांना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. (प्रतिनिधी)