सिरोंचात आविसं सर्व जागा लढणार
By Admin | Updated: October 11, 2015 02:35 IST2015-10-11T02:35:19+5:302015-10-11T02:35:19+5:30
सिरोंचा नगर पंचायत निवडणुकीत आदिवासी विद्यार्थी संघ सर्व १७ जागांवर उमेदवार उभे केले आहेत.

सिरोंचात आविसं सर्व जागा लढणार
शक्तिप्रदर्शन : दीपक आत्रामांच्या उपस्थितीत नामांकन दाखल
सिरोंचा : सिरोंचा नगर पंचायत निवडणुकीत आदिवासी विद्यार्थी संघ सर्व १७ जागांवर उमेदवार उभे केले आहेत. आविसं उमेदवारांचे नामांकन पत्र भरण्यासाठी माजी आमदार तथा आविसंचे ज्येष्ठ नेते दीपक आत्राम स्वत: हजर होते. त्यांच्या नेतृत्वातच आदिवासी विद्यार्थी संघ सिरोंचा नगर पंचायतीची निवडणूक लढणार आहे. आविसं उमेदवारांनी नामांकन पत्र भरण्यापूर्वी सिरोंचाच्या मुख्य चौकातून जाऊन शक्तिप्रदर्शन केले.
आविसंच्या वतीने प्रभाग क्र. १ मध्ये सरोजा क्रिष्णमूर्ती चिटुरी, प्रभाग २ मध्ये कल्याणी ओमकार ताटीकोंडावार, प्रभाग क्र. ३ मध्ये सुमांजली महेश दुम्पला, प्रभाग क्र. ४ मध्ये अंजली लिंगय्या पंचारिया, प्रभाग क्र. ५ मध्ये नलिनी सुरेश पोलोजी, प्रभाग क्र. ६ मध्ये गौतमी पुनमचंद गग्गुरी, प्रभाग क्र. ७ रवी मल्लय्या सल्लम, प्रभाग क्र. ८ मध्ये श्याम सुरेश बेज्जनवार, प्रभाग क्र. ९ मध्ये महेश्वरी संजीव पेदापेल्ली, प्रभाग क्र. १० मध्ये सय्यद रहमुनीस सत्तार, प्रभाग क्र. ११ मध्ये लक्ष्मी सत्यम चिलमुला, प्रभाग क्र. १२ मध्ये नरेशकुमार केशव अलोणे, प्रभाग क्र. १३ शिला शंकर कावरे, प्रभाग क्र. १४ स्वाती अरूण परसा, प्रभाग क्र. १५ मारोती सत्यम गणपुरपू, प्रभाग क्र. १६ लक्ष्मण येल्लेला, प्रभाग क्र. १७ मध्ये रवी पापय्या बोंगोनी यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहे. यावेळी माजी आ. दीपक आत्राम उपस्थित होते.