शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
2
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
3
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
4
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
5
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!
6
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
7
Chaitra Amavasya 2025: चैत्र अमावस्येपासून दर अमावास्येला सुरू करा अग्निहोत्र; होतील अपार लाभ!
8
देशातील पहिला टेस्ला सायबर ट्रक गुजरातमध्ये पोहोचला, सुरतच्या हीरा व्यापाऱ्याची मोठी खरेदी, कोण आहे ती व्यक्ती?
9
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
10
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  
11
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
12
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
13
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
14
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
15
ती माझी मैत्रीण! दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीबाबत एल्विश यादवचा खुलासा, म्हणाला- "तो फोटो पाहिल्यानंतर..."
16
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
17
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
18
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
19
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
20
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या

आतापर्यंतच्या सर्व नमुन्यांचे अहवाल निगेटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2020 05:01 IST

दोन दिवसांपूर्वी अहेरी तालुक्यातील नागेपल्ली येथे दोन संशयित रुग्ण असल्याचे आरोग्य विभागाच्या लक्षात आल्यानंतर प्रशासनाकडून तत्काळ तिथे संसर्ग टाळण्यासाठीच्या उपाययोजना राबविण्यात आल्या. आता त्या संशयिताचाही अहवाल निगेटीव्ह आला आहे. संपूर्ण जिल्हाभर नागेपल्ली येथील संशयित रु ग्णाबाबत चर्चा सुरू झाली होती. प्रशासनाकडून तत्काळ पुढील संसर्ग टाळण्यासाठी आरोग्य विभागाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार कार्यवाही करण्यात आली.

ठळक मुद्देगडचिरोलीकरांना मोठा दिलासा : प्रशासकीय व आरोग्य यंत्रणेच्या आतापर्यंतच्या उपाययोजनांना यश

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : कोरोना विषाणूचा संसर्ग टाळण्याठी प्रशासकीय आणि आरोग्य यंत्रणेकडून केल्या जात असलेल्या प्रयत्नांना बऱ्याच प्रमाणात यश आले आहे. जिल्ह्यात या विषाणूचा संसर्ग झाल्याचे अद्याप तरी आढळलेले नाही. आतापर्यंत तपासलेल्या ४० संशयितांच्या नमुन्यांपैकी सर्वच नमुने निगेटिव्ह आल्यामुळे प्रशासनासोबतच नागरिकांनाही मोठा दिलासा मिळाला आहे. मात्र असे असले तरी लगतच्या काही जिल्ह्यांमधून कोरोनाचा संसर्ग होऊ नये यासाठी लॉकडाऊनच्या काळातील उपाययोजनांची आधीप्रमाणेच कडक अंमलबजावणी सुरू राहणार असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.आतापर्यंत ७७ लोकांना विविध ठिकाणी क्वारंटाईन करून ठेवले होते. त्यापैकी ६८ जणांचा क्वारंटाईन कालावधी पूर्ण झाला असून ९ जण अजून त्यांच्या घरीच निरीक्षणाखाली आहेत.दोन दिवसांपूर्वी अहेरी तालुक्यातील नागेपल्ली येथे दोन संशयित रुग्ण असल्याचे आरोग्य विभागाच्या लक्षात आल्यानंतर प्रशासनाकडून तत्काळ तिथे संसर्ग टाळण्यासाठीच्या उपाययोजना राबविण्यात आल्या. आता त्या संशयिताचाही अहवाल निगेटीव्ह आला आहे.संपूर्ण जिल्हाभर नागेपल्ली येथील संशयित रु ग्णाबाबत चर्चा सुरू झाली होती. प्रशासनाकडून तत्काळ पुढील संसर्ग टाळण्यासाठी आरोग्य विभागाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार कार्यवाही करण्यात आली.गावात आरोग्य विभाग, पोलीस प्रशासन, महसूल व ग्रामस्थ यांच्या समन्वयातून संपूर्ण संचारबंदी करण्यात आली. गावात येणाºया सर्व सीमाही बंद करण्यात आल्या. त्या संशयित रुग्णाला भेटलेल्या व त्याच्या आजुबाजूच्या ५० लोकांना संस्थात्मक क्वारंटाईन करण्यात आले.गावात इतर ठिकाणी संसर्ग पसरू नये म्हणून अहवालाची वाट न पाहता प्रशासनाने ही पावले उचलत प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविल्या. घरोघरी सर्व्हेक्षण, आरोग्यविषयक तपासण्या, निर्जंतुकीकरण आदी बाबी यशस्वीरित्या राबविल्या. आता हा परिसर मोकळा करण्यात आला.काटेकोर नियोजन व अंमलबजावणीजिल्हाधिकारी दीपक सिंगला व मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.विजय राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली आणि पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांच्या सहकार्याने या प्रक्रि येला गती मिळाली. यामध्ये आशा, आरोग्य सेवक, तालुका आरोग्य अधिकारी व त्यांचे सर्व सहकारी यांनी गावात आरोग्यविषयक कामांना गती दिली. कोणत्याही प्रकारे संभावित संसर्ग होणार नाही याची दखल घेण्यात आली. पोलीस प्रशासनाकडून मोठया प्रमाणात बंदोबस्त लावण्यात आला होता. गावात सतत पेट्रोलिंग करून लोकांना आवश्यक माहिती देण्यात आली. नागेपल्ली परिसरातील सर्व पेट्रोल पंप, सेवासदन दवाखाने, बँका, दुकाने प्रामुख्याने दोन दिवस बंद ठेवण्यात आली.उपाययोजना सुरूच राहणार- जिल्हाधिकारीकोरोना संसर्ग हा एका व्यक्तीपासून किमान ४०० लोकांना होतो, असा इतिहास इतरत्र आहे. त्या अनुषंगाने जिल्हा प्रशासनाकडून ही पावले उचलण्यात आली. संशयित रुग्ण आढळल्यास त्याच्यापासून कमीत कमी संसर्ग व्हावा व ती संसर्ग साखळी तोडावी यासाठी आवश्यक ती पावले उचलण्यात आली. त्यासाठी आरोग्य विभाग, पोलीस, इतर विभागाचे अधिकारी व कर्मचारी तसेच ग्रामस्थांचे यांचे आभार मानत याच पद्धतीने आपण भविष्यात काळजी घेऊन गडचिरोली जिल्हा कोरोनामुक्त कायम ठेवण्यासाठी प्रयत्न करूया, असे आवाहन जिल्हाधिकारी दीपक सिंगला यांनी केले. आता १४ एप्रिलनंतर जिल्ह्यातील लॉकडाऊन शिथिल होणार का, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.आरोग्य विभागाच्या २३ टीमकडून नागेपल्लीत तपासणीसंशयित रुग्णाच्या पाशर््वभूमीवर प्राथमिक आरोग्य केंद्र महागाव, नागेपल्ली व तालुक्यातील इतर ठिकाणचे मिळून ५ पर्यवेक्षक, ३ वैद्यकीय अधिकारी ४६ कर्मचारी यांनी २३ टीम करून नागेपल्ली येथे रु ग्ण शोध मोहीम राबवली. यावेळी त्यांना आवश्यक मास्क, हातमोजे, सॅनिटायझर अशा सुविधा देण्यात आल्या. त्यांना राहण्याची व्यवस्था एकलव्य वसतिगृहात करण्यात आली. प्रवासासाठी एसटी महामंडळाची बस देवून तिचे दोन वेळा निर्जंतुकीकरणही केले.संभावित संसर्ग टाळण्यासाठी गावातील १०९८ घरांचे सर्वेक्षण पूर्ण केले. ४१३३ सदस्यांची तपासणी पूर्ण केली. यामध्ये ३ लोकांना ताप आणि खोकला आढळून आला. एक वर्षाच्या आतील ६० मुलांचीही तपासणी करण्यात आली. १८ गरोदर महिलांनाही यावेळी आवश्यक उपचार करण्यात आले. अहेरीचे तहसीलदार ओंकार ओतारी यांच्या मार्गदर्शनात हे अभियान पूर्ण करण्यात आले.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या