पानसरे यांच्या हत्येचा सर्वपक्षीय निषेध
By Admin | Updated: February 23, 2015 01:27 IST2015-02-23T01:27:45+5:302015-02-23T01:27:45+5:30
राज्यातील ज्येष्ठ विचारवंत व भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे नेते गोविंद पानसरे यांच्या हत्येचा निषेध करण्यासाठी स्थानिक इंदिरा गांधी चौकात रविवारी ...

पानसरे यांच्या हत्येचा सर्वपक्षीय निषेध
गडचिरोली : राज्यातील ज्येष्ठ विचारवंत व भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे नेते गोविंद पानसरे यांच्या हत्येचा निषेध करण्यासाठी स्थानिक इंदिरा गांधी चौकात रविवारी सायंकाळी सर्वपक्षीय निषेध सभा आयोजित करण्यात आली. या सभेत त्यांना श्रद्धांजलीही अर्पण करण्यात आली.
यावेळी माजी आमदार तथा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष डॉ. नामदेव उसेंडी, काँग्रेस प्रदेश कार्यकारिणी सचिव हसनअली गिलानी, भारीप बहुजन महासंघाचे जिल्हाध्यक्ष रोहिदास राऊत, चंद्रभान मेश्राम, विनोद ब्राम्हणवाडे, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रकाश ताकसांडे, विलास निंबोरकर, कुसूम आलाम, चंद्रशेखर भडांगे, प्रा. दिलीप बारसागडे, सुरेश पद्मशाली, जगन जांभूळकर, दर्शना लोणारे, संदीप रहाटे, लक्ष्मनराव पापडकर, पुरूषोत्तम ठाकरे, नामदेव गडपल्लीवार, काशीनाथ भडके, समीर खॉ. पठाण, वसंतराव कुलसंगे, पंकज गुड्डेवार, अमिता लोणारकर, अम्रीश उराडे, सुरेखा बारसागडे, सतिश पवार यांच्यासह सामाजिक कार्यकर्ते व शेकडो नागरिक उपस्थित होते.
गोविंद पानसरे यांच्यावरील हल्ला हा पुरोगामी विचारांवरील हल्ला आहे. प्रतिगामी विचारांचे लोक पुरोगामी विचारांना दडपण्यासाठी अशा प्रकारचे भ्याड हल्ले करीत आहेत. पुरोगामी विचारांचे राज्य म्हणून महाराष्ट्राला ओळखले जाते. मात्र याच राज्यात पुरोगामी विचार संपविण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत. हा देश व राज्यासाठी अतिशय घातक ठरणारे आहे. पानसरे यांच्या मारेकऱ्यांना तत्काळ अटक करण्यात यावी अशी मागणी निषेध सभेदरम्यान करण्यात आली. पानसरे यांना लाल सलाम, पानसरे अमर रहे अशा घोषणा देण्यात आल्या.एक मिनीट मौन पाळण्यात आले व त्यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. (नगर प्रतिनिधी)