सर्वच नगर पंचायतींचे निवडणूक निरीक्षक जाहीर
By Admin | Updated: October 4, 2015 02:14 IST2015-10-04T02:14:49+5:302015-10-04T02:14:49+5:30
गडचिरोली जिल्ह्यातील नऊ नगर पंचायतींची निवडणूक होऊ घातली आहे. सदर निवडणूक शांततेत व नियोजनानुसार पार पाडण्यासाठी ....

सर्वच नगर पंचायतींचे निवडणूक निरीक्षक जाहीर
गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यातील नऊ नगर पंचायतींची निवडणूक होऊ घातली आहे. सदर निवडणूक शांततेत व नियोजनानुसार पार पाडण्यासाठी निवडणूक विभागाने निवडणूक निरीक्षक व मुख्य निवडणूक निरीक्षक जाहीर केले आहेत.
मुख्य निवडणूक निरीक्षक म्हणून चंद्रपूरचे अप्पर जिल्हाधिकारी संजय धिवरे काम सांभाळणार आहेत. चामोर्शी नगर पंचायतीचे निवडणूक निरीक्षक म्हणून सहायक वनसंरक्षक चंद्रपूर, एटापल्लीचे निवडणूक निरिक्षक म्हणून चंद्रपूर येथील जिल्हा कृषी अधीक्षक, कुरखेडाचे निवडणूक निरीक्षक म्हणून जिल्हा परिषदेचे समाज कल्याण अधिकारी काम पाहणार आहेत. मुलचेरा नगर पंचायतीचे निवडणूक निरीक्षक म्हणून ब्रह्मपुरीचे सहायक वनसंरक्षक काम पाहणार आहेत. कोरची नगर पंचायतीचे निवडणूक निरिक्षक म्हणून टेक्सटाईलचे नागपूर येथील सहसंचालक (प्रशासन) काम पाहणार आहेत. अहेरी नगर पंचायतीचे निवडणूक निरीक्षक म्हणून उद्योगाचे सहसंचालक राहणार आहेत. भामरागडचे निवडणूक निरीक्षक म्हणून प्रादेशिक दुग्ध व्यवसाय अधिकारी नागपूर, धानोराचे निवडणूक निरीक्षक म्हणून सहायक आयुक्त समाज कल्याण चंद्रपूर व सिरोंचा नगर पंचायतीचे निवडणूक निरीक्षक म्हणून जिल्हा मुद्रांक निबंधक चंद्रपूर हे काम पाहणार आहेत.
निर्वाचन अधिकारी म्हणून स्थानिक तहसीलदारांची नेमणूक करण्यात आली आहे. तर सहायक निर्वाचन अधिकारी म्हणून त्याच तहसील कार्यालयातील नायब तहसीलदारांना नेमण्यात आले आहे. विशेष म्हणजे नगर पंचायतीची निवडणूक पहिल्यांदाच घेतली जात आहे. त्यामुळे मतदारांमध्ये उत्साह आहे. त्याचबरोबर निवडणूक शांततेत पार पाडण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. (नगर प्रतिनिधी)