ऑनलाईन लोकमतगडचिरोली : मुख्यमंत्री कार्यालय व महाराष्ट्रज्ञान विकास महामंडळ (एमकेसीएल) यांच्या वतीने ‘महालाभार्थी’ पोर्टल तयार करण्यात आले असून या पोर्टलवर शासनाच्या संपूर्ण योजनांची माहिती उपलब्ध आहे, अशी माहिती एमकेसीएलचे पूर्व विदर्भ विभागीय समन्वयक शशिकांत देशपांडे यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे.सामान्य जनतेसाठी अनेक योजना असल्या तरी या योजनांची माहिती नागरिकांना नाही. घरबसल्या लाभार्थ्याला अपेक्षीत असलेल्या योजनेची माहिती उपलब्ध व्हावी, यासाठी महालाभार्थी हे पोर्टल तयार करण्यात आले आहे. या पोर्टलमध्ये शासनाच्या सुमारे २२९ योजनांची माहिती आहे. संकेतस्थळावर क्लिक करून आवश्यक ती माहिती भरून प्रथम नोंदणी करावी लागते. लाभासंदर्भात थोडीफार माहिती भरल्यानंतर संबंधित नागरिक कोणत्या योजनेसाठी पात्र ठरू शकते. अशा निवडक योजनांची माहिती पोर्टल उपलब्ध करून देते. योजनेमध्ये मिळणारा नेमका लाभ, लागणारी कागदपत्रे, कुठे संपर्क करावा आदी बाबतची माहिती उपलब्ध होते. त्यानंतर संबंधित व्यक्तीला शासकीय कार्यालयांमध्ये अर्ज करता येते.बारावी पास असलेल्या विद्यार्थ्याला त्याच्या आवडीप्रमाणे कंपन्यांमध्ये रोजगार उपलब्ध करून दिला जातो. त्यानंतर त्याची बीबीए किंवा बीएससी अभ्यासक्रमाला प्रवेश करून दिला जातो, अशी माहिती देशपांडे यांनी दिली. यावेळी प्रशांत मंगळगिरी उपस्थित होते.
‘महालाभार्थी’ पोर्टलवर सर्व शासकीय योजनांची माहिती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 11, 2018 01:04 IST
ऑनलाईन लोकमतगडचिरोली : मुख्यमंत्री कार्यालय व महाराष्ट्रज्ञान विकास महामंडळ (एमकेसीएल) यांच्या वतीने ‘महालाभार्थी’ पोर्टल तयार करण्यात आले असून या पोर्टलवर शासनाच्या संपूर्ण योजनांची माहिती उपलब्ध आहे, अशी माहिती एमकेसीएलचे पूर्व विदर्भ विभागीय समन्वयक शशिकांत देशपांडे यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे.सामान्य जनतेसाठी अनेक योजना असल्या तरी या योजनांची माहिती नागरिकांना नाही. ...
‘महालाभार्थी’ पोर्टलवर सर्व शासकीय योजनांची माहिती
ठळक मुद्दे२२९ योजना : शासन व एमकेसीएलचा उपक्रम