जिल्ह्यात आलापल्ली सर्वात मोठी तर वेंगनूर सर्वात लहान ग्रामपंचायत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2021 04:29 IST2021-01-02T04:29:42+5:302021-01-02T04:29:42+5:30

आरमोरी तालुक्यात वैरागड, वडधा या मोठ्या ग्रामपंचायती आहेत, तर सायगाव ही सर्वात लहान ग्रामपंचायत आहे. या भागात काँग्रेस आणि ...

Alapally is the largest and Venganur the smallest gram panchayat in the district | जिल्ह्यात आलापल्ली सर्वात मोठी तर वेंगनूर सर्वात लहान ग्रामपंचायत

जिल्ह्यात आलापल्ली सर्वात मोठी तर वेंगनूर सर्वात लहान ग्रामपंचायत

आरमोरी तालुक्यात वैरागड, वडधा या मोठ्या ग्रामपंचायती आहेत, तर सायगाव ही सर्वात लहान ग्रामपंचायत आहे. या भागात काँग्रेस आणि भाजपच्या काऱ्यकर्त्यांमध्ये थेट लढत होण्याची शक्यता आहे. देसाईगंज तालुक्यात कुरूड ही सर्वात मोठी तर कसारी तुकूम ही सर्वात लहान ग्रामपंचायत आहे. या ग्रामपंचायतींवर भाजप-काँग्रेसची सत्ता आहे. यावेळीही परंपरागत लढत होणार की अविरोध निवडणूक होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

धानोरा तालुक्यात मुरूमगाव ही सर्वात मोठी तर रेखाटोला ही सर्वात लहान ग्रामपंचायत आहे. या भागात काँग्रेस आणि भाजपच्या काऱ्यकर्त्यांमध्येच रस्सीखेच आहे. कोरची तालुक्यात बिहीटेकला या सर्वात मोठ्या ग्रामपंचायतवर काँग्रेसचे वर्चस्व होते. सर्वात लहान असलेल्या आस्वालहुडकी ग्रामपंचायतवरही काँग्रेसच्या काऱ्यकर्त्यांचेच प्राबल्य आहे. यावेळी ते कायम राहते का याकडे नागरिकांचे लक्ष राहणार आहे.

चामोर्शी तालुक्यात कुनघाडा रै ही सर्वात मोठी तर मुधोली रीठ ही सर्वात लहान ग्रामपंचायत आहे. या ग्रामपंचायतींवर काँग्रेसचा प्रभाव होता. यावेळी भाजप मुसंडी मारणार का, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.

(बॉक्स)

३६१ निवडणूक होत असलेल्या ग्रामपंचायती

सर्वात मोठी ग्रामपंचायत आलापल्ली, १७ एकूण सदस्य संख्या, ८६४२ एकूण मतदार, ४२१० पुरूष मतदार, ४४३२ महिला मतदार

सर्वात लहान ग्रामपंचायत वेंगनूर, ७ एकूण सदस्य संख्या, २४२ एकूण मतदार, १२६ पुरूष मतदार, ११६ महिला मतदार

Web Title: Alapally is the largest and Venganur the smallest gram panchayat in the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.