शहरात एड्स जनजागृती रॅली

By Admin | Updated: December 1, 2014 22:54 IST2014-12-01T22:54:32+5:302014-12-01T22:54:32+5:30

एचआयव्ही एड्सचा प्रसार रोखण्यासाठी नागरिकांमध्ये जाणीव जागृतीची आवश्यकता लक्षात घेऊन शहरात शाळा, विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी जनजागृती रॅली काढली. विविध घोषवाक्य व संबोधनातून

AIDS Awareness Rally in the city | शहरात एड्स जनजागृती रॅली

शहरात एड्स जनजागृती रॅली

गडचिरोली : एचआयव्ही एड्सचा प्रसार रोखण्यासाठी नागरिकांमध्ये जाणीव जागृतीची आवश्यकता लक्षात घेऊन शहरात शाळा, विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी जनजागृती रॅली काढली. विविध घोषवाक्य व संबोधनातून विद्यार्थ्यांनी शहरात जनजागृती केली. त्यामुळे शहरातील वातावरण दुमदुमले होते.
जिल्हा एड्स नियंत्रण समिती जिल्हा सामान्य रूग्णालयाच्यावतीने रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. रॅलीची सुरूवात सामाजिक कार्यकर्ते नामदेव गडपल्लीवार यांच्याहस्ते हिरवी झेंडी दाखवून करण्यात आली. यावेळी अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अनिल रूडे, जिल्हा रक्त संक्रमण अधिकारी डॉ. शैलजा मैंदमवार, जिल्हा कार्यक्रम अधिकारी महेश भांडेकर उपस्थित होते. यावेळी कार्यक्रमाच्या सुरूवातीला एड्स विरोधी शपथेचे वाचन करण्यात आले. त्यानंतर रॅली शहरातील मुख्य मार्गावरून फिरवून नवीन स्त्रि रूग्णालय परिसरात समारोप करण्यात आला. दरम्यान आयोजित कार्यक्रमात डॉ. अनिल रूडे यांनी जीवनात संयम पाळा, तरूण वयात असणारे धोके व त्यापासून होणारे परिणाम याविषयी मार्गदर्शन केले. यावेळी जिल्ह्यात राबविण्यात येणाऱ्या विविध कार्यक्रमांविषयी माहिती देण्यात आली. त्याबरोबरच तालुकास्तरावरील आयटीसीटीसी याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. कबीर निकुरे यांनी एचआयव्ही बाधितांना सामान्य जीवन जगता येते, याविषयी मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे संचालन सविता वैद्य तर आभार रंजना भंडारवार यांनी मानले. यशस्वीतेसाठी माधूरी देवांगन, संतोषी भारती, अनिल राऊत, बेबीनंदा डोंगरे, रंजना पंदिलवार, अजिता पाणीकर, अरूण डोनारकर, रजनी चौधरी यांनी सहकार्य केले. यावेळी आरोग्य कर्मचारी उपस्थित होते.
शहरातील सनराईज स्कूलच्यावतीने जागतिक एड्स निर्मूलन दिनानिमित्त रॅली काढण्यात आली. यावेळी शाळेचे संस्थापक डॉ. राहूल ठवरे, मुख्याध्यापिका शीतल खोब्रागडे, धनश्री कायनात, जयश्री, वर्षा, आशा, माधुरी, रिना आदी सहभागी झाल्या होत्या. रॅलीत विद्यार्थ्यांनी विविध घोषवाक्यातून नागरिकांमध्ये जाणीव जागृती केली.

Web Title: AIDS Awareness Rally in the city

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.