दुष्काळग्रस्त लोकांसाठी अहेरीकरांची मदत

By Admin | Updated: April 19, 2016 05:39 IST2016-04-19T05:39:13+5:302016-04-19T05:39:13+5:30

मराठवाड्यासह विदर्भाच्या काही भागात दुष्काळग्रस्त परिस्थिती निर्माण झाली आहे. या भागातील नागरिकांना दिलासा

Aheriq support for drought-hit people | दुष्काळग्रस्त लोकांसाठी अहेरीकरांची मदत

दुष्काळग्रस्त लोकांसाठी अहेरीकरांची मदत

अहेरी : मराठवाड्यासह विदर्भाच्या काही भागात दुष्काळग्रस्त परिस्थिती निर्माण झाली आहे. या भागातील नागरिकांना दिलासा देण्यासाठी हेल्पिंग हॅन्ड्स बहुउद्देशिय सामाजिक सेवा संस्था अहेरीच्या वतीने दान महोत्सव राबविण्यात आला. या महोत्सवादरम्यान जमा झालेले वस्तू व कपडे भरून वाहनातून हेल्पिंग हॅन्ड्सची चमू सोमवारी यवतमाळकडे रवाना झाली.
दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी हेल्पिंग हॅन्ड्स संस्थेच्या कार्यकर्त्यांसह लोकप्रतिनिधी तसेच काही सामाजिक कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले. वापरात न येणाऱ्या वस्तू व कपडे जमा करण्याचे काम हेल्पिंग हॅन्ड्सतर्फे हाती घेण्यात आले. गेल्या १० दिवसांपासून संस्थेच्या कार्यकर्त्यांनी हा उपक्रम राबविला. जमा झालेले कपडे व वस्तू श्रमसाफल्य बहुउद्देशिय संस्था घाटंजी, आधार फाऊंडेशन यवतमाळ व अस्तित्व फाऊंडेशन यवतमाळ यांच्या मदतीने दुष्काळग्रस्त भागात पोहोचविण्यात येणार आहे. जमा झालेले कपडे व वस्तूंनी भरलेल्या वाहनाला जि. प. च्या महिला व बालकल्याण सभापती सुवर्णा खरवडे, आर्यवैश्य कोमटी समाज अहेरीचे अध्यक्ष प्रकाश गुडेल्लीवार, प्रतिष्ठीत नागरिक मुतन्ना दोंतुलवार, अहेरी नगर पंचायतीच्या महिला व बालकल्याण सभापती अर्चना विरगोनवार यांनी हिरवी झेंडी दाखविली.
याप्रसंगी अहेरीचे नगरसेवक श्रीनिवास चटारे, नगरसेविका ममता पटवर्धन, पूर्वा दोंतुलवार, किरण भांदककर, हेल्पिंग हॅन्ड्सचे अध्यक्ष प्रतीक मुधोळकर, सचिव शंकर मगडीवार, सदस्य इस्ताक शेख आदींसह हेल्पिंग हॅन्ड्सचे इतर सदस्य उपस्थित होते. हेल्पिंग हॅन्ड्सच्या वतीने वापरात न येणाऱ्या वस्तू व कपडे जमा करण्याच्या उपक्रमासाठी प्रतीक मुधोळकर, पूर्वा दोंतुलवार, अर्चना विरगोनवार, ममता पटवर्धन, शंकर मगडीवार, नूर मोहम्मद, संदीप गुम्मलवार, अनुराग बेझलवार, आशिष गडपाडे, अमित दोंतुलवार, मयूर बुम्मुलवार, सोनू नार्लावार आदींनी सहकार्य केले. (प्रतिनिधी)

Web Title: Aheriq support for drought-hit people

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.