अहेरीनगरी प्लास्टिक व घाणमुक्त होणार
By Admin | Updated: December 19, 2015 01:36 IST2015-12-19T01:36:09+5:302015-12-19T01:36:09+5:30
स्थानिक नगर पंचायत पदाधिकारी व प्रशासनाने पुढाकार घेतल्यामुळे आता २६ जानेवारी २०१६ पासून अहेरीनगरी प्लास्टिक व घाणमुक्त होणार आहे.

अहेरीनगरी प्लास्टिक व घाणमुक्त होणार
प्रजासत्ताक दिनापासून : न. पं. च्या बैठकीत निर्णय
अहेरी : स्थानिक नगर पंचायत पदाधिकारी व प्रशासनाने पुढाकार घेतल्यामुळे आता २६ जानेवारी २०१६ पासून अहेरीनगरी प्लास्टिक व घाणमुक्त होणार आहे.
यासंदर्भात १६ डिसेंबर रोजी अहेरीच्या नगर पंचायत कार्यालयात नगराध्यक्ष प्राजक्ता पेदापल्ली यांच्या अध्यक्षतेखाली सर्व पदाधिकारी व नगरसेवकांची बैठक पार पडली. या बैठकीत प्लास्टिकवर बंदी तसेच व्यापारी व शाळांच्या सहकार्याने महिन्यातून एक दिवस शहरात स्वच्छता मोहीम राबविण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. त्यानंतर १८ डिसेंबर रोजी शुक्रवारला नगर पंचायतीच्या सभागृहात पदाधिकारी, व व्यापाऱ्यांची संयुक्त बैठक झाली. या बैठकीत प्लास्टिक बंदी व महिन्याच्या दुसऱ्या शुक्रवारी स्वच्छता मोहीम राबविण्याचा निर्णय घेण्यात आला. सभेला सभापती अर्चना विरगोणवार, स्मिता येमुलवार, उपसभापती ममता पटवर्धन, नगरसेविका रेखा सडमेक, कमल पडगेलवार, गिरीश मद्देर्लावार, अमोल मुक्कावार आदीसह शहरातील व्यापारी उपस्थित होते. (प्रतिनिधी)