अहेरीचा पाणी पुरवठा ठप्प
By Admin | Updated: December 8, 2015 01:44 IST2015-12-08T01:44:57+5:302015-12-08T01:44:57+5:30
सोमवारपासून अहेरी शहरातील १० प्रभागातील पाणी पुरवठा बंद झाला आहे. परिणामी नागरिकांना पाण्यासाठी पायपीट

अहेरीचा पाणी पुरवठा ठप्प
अहेरी : सोमवारपासून अहेरी शहरातील १० प्रभागातील पाणी पुरवठा बंद झाला आहे. परिणामी नागरिकांना पाण्यासाठी पायपीट करावी लागत आहे. येथील महागाव मार्गावरील महाराष्ट्र जीवन प्राधिकरण कार्यालयासमोर प्राधिकरणाच्या कर्मचाऱ्यांनी प्रलंबित मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधून घेण्यासाठी बेमुदत उपोषण सुरू केले आहे.
संपाची माहिती मिळताच नगराध्यक्ष प्राजक्ता पेदापल्लीवार, पाणी पुरवठा व जलनिस्सारण सभापती स्मिता येमुलवार, नगरसेवक श्रीनिवास चटारे, हर्षा ठाकरे, रेखा सडमेक, कमला पडगेलवार, दामोधर सिडाम, सचिन पेदापल्लीवार, मालू तोडसाम, प्रशासक एस. आर. पुप्पलवार, नायब तहसीलदार एस. एन.सिलमवार यांनी भेट दिली. आनंद भालादरे, प्रेमदास घुटके, विवेक ताम्हण, अजय कोतपल्लीवार, प्रकाश गट्टेवार, कोंडलेकर आदी सहभागी झाले आहे. (शहर प्रतिनिधी)
जीवन प्राधिकरण कर्मचाऱ्यांच्या संपाबद्दल आजच माहिती मिळाली. पाणी हे जीवनावश्यक वस्तू असल्याने याबाबत शासनाला कळवू. अहेरी नगर पंचायत संप काळापर्यंत अहेरीकरांना पाणी पुरवठा करण्याची जबाबदारी स्वीकारत आहे. पाणी पुरवठ्याचे काम करणाऱ्या कामगारांना नगर पंचायततर्फे वेतन अदा करू. - प्राजक्ता पेदापल्लीवार, नगराध्यक्ष, नगर पंचायत अहेरी