अहेरीत विठू नामाचा गजर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2015 02:36 IST2015-07-28T02:36:46+5:302015-07-28T02:36:46+5:30
आषाढी एकादशी निमित्त शहरातील अनेक भागात सोमवारी पहाटेपासून विविध कार्यक्रम घेऊन भाविकांचा विठ्ठल

अहेरीत विठू नामाचा गजर
आषाढी एकादशी : ओंकारम, सुप्रभातम व नगर संकीर्तनासह काढली दिंडी
अहेरी : आषाढी एकादशी निमित्त शहरातील अनेक भागात सोमवारी पहाटेपासून विविध कार्यक्रम घेऊन भाविकांचा विठ्ठल नामाचा गजर अहेरीनगरीत सर्वत्र निनादला. शहरात सकाळी पहाटेपासून ओंकारम, सुप्रभातम व नगर संकीर्तन करण्यात आले. तसेच शहरातून काढलेल्या दिंडीमुळे अहेरी नगरी दुमदुमली.
दिंडी व कलशयात्रेमुळे विठ्ठल नामाचा गजर संपूर्ण अहेरी नगरीत निनादला. सायंकाळच्या सुमारास शहरातील सर्व सार्वजनिक भोजन मंडळाच्या वतीने भोजन कार्यक्रम घेण्यात आला.
यावेळी विठ्ठल नामाच्या भावभक्तीचे विविध भजन वारकरी व भाविकांनी सादर केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विठ्ठल-रखुमाई विवाह सोहळा समिती, श्री सत्यसाई सेवा समिती, मद्दीवार शाळेचे विद्यार्थी, शिक्षक, भजन मंडळ व वारकऱ्यांनी सहकार्य केले. (प्रतिनिधी)