अहेरीला मिळाले आयएएस दर्जाचे एसडीओ

By Admin | Updated: December 8, 2015 01:42 IST2015-12-08T01:42:14+5:302015-12-08T01:42:14+5:30

अहेरीचे उपविभागीय अधिकारी म्हणून एस. राममूर्ती यांनी ४ डिसेंबर रोजी पदभार स्वीकारला आहे. त्यांच्याकडे एसडीओ

Aheri received IAS quality SDO | अहेरीला मिळाले आयएएस दर्जाचे एसडीओ

अहेरीला मिळाले आयएएस दर्जाचे एसडीओ

अहेरी : अहेरीचे उपविभागीय अधिकारी म्हणून एस. राममूर्ती यांनी ४ डिसेंबर रोजी पदभार स्वीकारला आहे. त्यांच्याकडे एसडीओ पदाबरोबरच एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अहेरी, एटापल्लीच्या एसडीओ पदाचा प्रभार सुध्दा सोपविण्यात आला आहे.
यापूर्वी त्यांनी भारत सरकारच्या जमीन संधारण विभागात सहायक सचिव पदावर काम केले आहे. ते मूळचे तामिळनाडू राज्यातील आहेत. २०१३ च्या बॅच ते आयएएस अधिकारी आहेत. यावेळी लोकमतशी बोलताना एस. राममूर्ती यांनी सांगितले की, आपण आयएएस असलो तरी सामान्य नागरिकांच्या समस्या आपण प्राधान्याने सोडवू, जनतेने त्यांच्या आपल्याकडे मांडाव्या, जनतेच्या सेवेसाठी आपल्याला या ठिकाणी पाठविण्यात आले आहे, असे सांगितले. (प्रतिनिधी)

Web Title: Aheri received IAS quality SDO

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.