अहेरीचे भूमी अभिलेख कार्यालय ‘डेप्युटेशन’वर

By Admin | Updated: May 15, 2015 01:28 IST2015-05-15T01:28:45+5:302015-05-15T01:28:45+5:30

येथील भुमिअभिलेख उपअधीक्षक कार्यालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांपासून शिपायापर्यंत जवळजवळ चार जणांना जिल्ह्यासह नागपूरातही डेप्युटेशनवर पाठविण्यात आल्याने ...

Aheri land records office at 'Deputation' | अहेरीचे भूमी अभिलेख कार्यालय ‘डेप्युटेशन’वर

अहेरीचे भूमी अभिलेख कार्यालय ‘डेप्युटेशन’वर

प्रतिक मुधोळकर अहेरी
येथील भुमिअभिलेख उपअधीक्षक कार्यालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांपासून शिपायापर्यंत जवळजवळ चार जणांना जिल्ह्यासह नागपूरातही डेप्युटेशनवर पाठविण्यात आल्याने या कार्यालयात कर्मचाऱ्यांचा प्रचंड तुटवडा निर्माण झाला आहे. नागरिकांची वाढती गर्दी व कर्मचाऱ्यांची कमतरता यामुळे काम न होताच नागरिकांना कार्यालयातून आल्यापावली परतावे लागत आहे.
सध्या विविध समस्यांनी ग्रासले असून कार्यालय दिसणाऱ्या खाली खुर्च्या बघून कार्यालय रामभरोसे असल्याचे दिसून येत आहे. महत्वाचे कार्यालय असल्या कारणाने तालुक्यातील अनेक नागरिक दररोज जमिनीच्या विविध कामांसाठी या कार्यालयात येतात मात्र कार्यालय खाली खुर्च्या बघून नागरिक हतबल होवून आल्या पावली वापस जात आहे.
अहेरी भूमिअभिलेख उप अधीक्षक कार्यालयातील अनेक पदे रिक्त आहे. यात उप अधीक्षक पद रिक्त आहे सध्या भामरागडचे उप अधीक्षक एस.ए. बोरसे यांच्याकडे अहेरीचा अतिरिक्त पदभार आहे मात्र अहेरीत ते क्वचितच येत असतात. दोन निमतनदार पैकी एक पद,एक मुख्यालय सहायक,एक शिरस्तेदार,आवक-जावक पद रिक्त आहे. तसेच सहा भूकरमापक अहेरीत कार्यरत होते मात्र त्यापैकी एक भूकरमापक आॅक्टोबर २०१४ पासून विनापरवानगी गैरहजर तर एक सिरोंचा येथे प्रतिनियुक्तीवर कार्यरत आहे. तसेच कनिष्ट लिपिक प्रतिनियुक्तीवर धानोरा येथे कार्यरत आहे व महत्वाचे नगर भूमापक हे प्रतिनियुक्तीवर नागपूर येथे कार्यरत आहे. शिपाईचे चार पैकी तीन पदे रिक्त आहेत तर एकमेव शिपाई गडचिरोली येथे प्रतिनियुक्तीवर कार्यरत आहे.
कार्यालयातील पदे भरण्यात यावी यासाठी श्रीराम जन्मोत्सव समिती सह विविध संघटनांनी आंदोलन सुद्धा केली मात्र परिस्थिती जैसे थे आहे. कार्यालयातील विविध पदे तत्काळ भरावी व नागरिकांचा त्रास कमी करावा अशी मागणी नागरिकांनी केली आहे. कार्यालयाच्या समस्यांबाबत अहेरीचे प्रभारी उप अधीक्षक यांच्याशी तब्बल १५ वेळा त्यांच्या भ्रमणध्वनीवर संपर्क करण्याच्या प्रयत्न केला मात्र त्यांनी भ्रमणध्वनी उचलला नाही. त्यामुळे त्यांची प्रतिक्रिया मिळू शकली नाही.

Web Title: Aheri land records office at 'Deputation'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.