अहेरीत शांतता सभा
By Admin | Updated: August 18, 2015 01:35 IST2015-08-18T01:35:55+5:302015-08-18T01:35:55+5:30
स्वातंत्र्यदिनी आलापल्ली येथील नागरिक, व्यापारी व शाळकरी मुलांना पोलिसांनी बेदम मारहान केली होती.

अहेरीत शांतता सभा
आलापल्ली : स्वातंत्र्यदिनी आलापल्ली येथील नागरिक, व्यापारी व शाळकरी मुलांना पोलिसांनी बेदम मारहान केली होती. त्यामुळे आलापल्ली येथे तणाव निर्माण झाला होता. त्याचबरोबर पोलीस विभागाप्रति नागरिकांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला होता. या पार्श्वभूमीवर अहेरी पोलीस मुख्यालयात शांतता सभा सोमवारी आयोजित करण्यात आली होती.
यावेळी अहेरीचे उपविभागीय पोलीस अधिकारी शिवाजी पवार, पोलीस निरीक्षक संजय मोरे, पोलीस उपनिरीक्षक रत्तुभाई मुलानी, किरण वाघ यांच्यासह आलापल्ली येथील व्यापारी, प्रतिष्ठीत नागरिक प्रामुख्याने उपस्थित होते.
यावेळी मार्गदर्शन करताना उपविभागीय पोलीस अधिकारी शिवाजी पवार यांनी आलापल्ली येथील मुख्य चौकात गोंधळ उडून एखाद्या सामाजिक कंटकाकडून दुकानांना आग लावणे, लुटालुट करणे आदी घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. ही बाब लक्षात घेऊन शांतता राखण्यासाठी लाठीचार्ज करावा लागला, असे मार्गदर्शन केले.
पोलिसांवर कारवाई करा
४लाठीचार्ज दरम्यान पोलिसांनी प्रतिष्ठित नागरिक, शिक्षक, वनरक्षक, वाहनचालक, विद्यार्थी, पानठेला व्यवसाय करणारे, प्रवासी यांच्यावर बेच्छुट लाठीचार्ज केला. यासाठी जबाबदार असलेल्या पोलिसांवर कारवाई करावी, अशी मागणी शांतता सभेदरम्यान आलापल्ली येथील नागरिकांनी एसडीपीओ पवार यांच्याकडे केली.