कृषिपंप अजूनही विजेच्या प्रतीक्षेत
By Admin | Updated: August 27, 2014 23:28 IST2014-08-27T23:28:31+5:302014-08-27T23:28:31+5:30
देसाईगंज शासनाच्या कृषी विभागामार्फत शेतकऱ्यांना विजेवर चालणारे मोटार पम्प मिळाले़ पम्प चालविण्याकरिता शेतकऱ्यांनी शेतातील विजेसाठी डिमांडची रक्कम भरून दोन वर्षाचा कालावधी लोटला मात्र

कृषिपंप अजूनही विजेच्या प्रतीक्षेत
दोन वर्ष लोटले : डिमांड भरले मात्र शेतकऱ्यांना विजेची जोडणी नाही
देसाईगंज शासनाच्या कृषी विभागामार्फत शेतकऱ्यांना विजेवर चालणारे मोटार पम्प मिळाले़ पम्प चालविण्याकरिता शेतकऱ्यांनी शेतातील विजेसाठी डिमांडची रक्कम भरून दोन वर्षाचा कालावधी लोटला मात्र अजूनही शेतकरी वीज जोडणीच्या प्रतीक्षेत आहेत़ नैसर्गिक संकट आल्यास शेतकऱ्यांची पिके विजेअभावी करपण्याची भीती देखील वर्तविण्यात येत आहे़
शेतकऱ्यांच्या सर्वागिण विकासाकरीता शासन विविध योजना राबविते मात्र शासकीय योजनांचा फायदा कित्येक शेतकऱ्यांसाठी दिवास्वप्न ठरत आहे़ शासनाच्या योजनेतून शेतकऱ्यांनी शेतात विहिरी बांधल्या. कृषी विभागामार्फत शेतकऱ्यांना विजेवर चालणारे मोटार पम्पही मिळाले़ मात्र विजेच्या जोडणीअभावी मोटारपम्प निरूपयोगी झाले आहेत़ शासन आपल्या अखत्यारीतील सर्वच विभागाला शेतकऱ्यांना सहकार्य राखण्याची भाषा बोलत असते़ मात्र शेतकऱ्यांचे वीज वितरण कंपनीमार्फत हाल होत असताना शासन केवळ बघ्याच्या भूमिकेत आहे़
सन २०१३-१४ मध्ये तालुका कृषी विभागामार्फत ३१५ व जिल्हा परिषद कृषी विभागामार्फत ९१ विजेवर चालणाऱ्या कृषी पम्पाचे वितरण करण्यात आले़ त्यापैकी अर्ध्यापेक्ष अधिक शेतकऱ्यांची पूर्वीचीच विजेची जोडणी आहे़ शेतातील कृषी पम्पाच्या नवीन वीज जोडणीकरिता मागिल दोन वर्षांपासून शेतकऱ्यांनी डिमांड भरलेला आहे़ दोन वर्षाचा कालावधी लोटूनही अजून पर्यंत शेतकऱ्यांना विजेची जोडणी मिळालेली नाही. जेष्ठता यादीनुसार कृषी पम्पाच्या जोडणीचे काम सुरू आहे असे वीज वितरण कंपनीने सांगितले आहे़ मात्र असे असतांना देखील वीज वितरण कंपनीकडे अजूनही १८० नविन कृषी वीज जोडणी शिल्लक आहे़ यावरून वीज वितरण कंपनी शेतकऱ्यांच्या बाबतीत किती उदासीन आहे हे लक्षात येते़ पावसाळयात वीज जोडणी होऊ शकत नाही़ मात्र आॅक्टोबर पासून तर जून महिन्यापर्यंत शेतकऱ्यांच्या शेतात विजेची जोडणी होऊ शकते. जेष्ठता यादीनूसार विजेची जोडणी होत असल्याचा गवगवा कंपनी करीत आहे़ मात्र ही जोडणी खरच त्यानुसार होते किंवा नाही या बाबत शेतकऱ्यांनी शहानिशा करणे गरजेचे आहे़ शेतकऱ्यांकडे विहीर, कृषी पम्प आहे. मात्र नैसर्गीक संकटामुळे शेतकऱ्यांना पाण्याची गरज भासल्यास शेताला पाणी उपलब्ध होऊ शकत नाही पम्प असतानाही विजेअभावी शेतातील पिके करपण्याची वेळ शेतकऱ्यांवर येण्याची शक्यता अनेक ठिकाणी निर्माण झाली आहे . (वार्ताहर)